ऑनलाईन सोनं खरेदी करताय? मग लगेच सावध व्हा, सेबीचा तो इशारा वाचला का?

Online Gold Purchasing : सेबीने डिजिटल वा ई-गोल्ड खरेदी करताना मोठा इशारा दिला आहे. गुंतवणूकदारांना याबाबत मोठा इशारा देण्यात आला आहे. सेबीनुसार हा व्यवहार करणे जोखीमयुक्त आहे. हा व्यवहार सेबीच्या नियंत्रणात, परीघात येत नाही.

ऑनलाईन सोनं खरेदी करताय? मग लगेच सावध व्हा, सेबीचा तो इशारा वाचला का?
डिजिटल गोल्ड
Updated on: Nov 09, 2025 | 1:00 PM

Digital Gold :  बाजार नियामक सेबीने गुंतवणूकदारांना डिजिटल वा ई-गोल्ड उत्पादनाबाबत मोठा इशारा दिला. गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या अनेक जण ऑनलाईन गोल्ड योजनांमध्ये वारेमाफ गुंतवणूक करत आहे. सोन्याचा भाव वधारल्याने अनेक जण ऑनलाईन गोल्डकडे वळले आहेत. त्यामुळे सेबीने मोठा इशारा दिला आहे. सेबीनुसार हा व्यवहार करणे जोखीमयुक्त आहे. हा व्यवहार सेबीच्या नियंत्रणात, परीघात येत नाही. अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म भौतिक सोन्याला पर्याय म्हणून ऑनलाईन गोल्ड खरेदीला आक्रमकपणे प्रोत्साहन देत असल्याचे सेबीचे म्हणणे आहे.

डिजिटल सोने हे सुरक्षित म्हणून अधिसूचीत केलेले नाही अथवा वायदे बाजारात डेरिव्हेटिव्ह म्हणून ही नियंत्रित केलेल नाही. त्यामुळे ते पूर्णपणे सेबीच्या परीघाबाहेर आहे. परिणामी सेबीच्या अख्त्यारीत जे गुंतवणूक प्रकार येतात, त्यांना लागू असलेले संरक्षण डिजिटल गोल्ड योजनांना लागू नाही. सेबीच्या या नवीन खुलाशामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहे. याप्रकरणी अशा प्लॅटफॉर्मवर सरकार काय कारवाई करते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. अथवा या प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर नियामक, नियंत्रक संस्था बसविण्याची मागणी करण्यात येत आहे.

गुंतवणूकदार कुठे गुंतवणूक करतात?

सेबीने गुंतवणूकदारांना सल्ला दिला आहे की, सोन्यातील गुंतवणूक केवळ सेबी नियंत्रीत साधनांच्या माध्यमातूनच करण्यात यावी. यामध्ये गोल्ड ईटीएफ, इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स आणि एक्सचेंज-ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्स यांचा समावेश आहे. कारण हे उत्पादन मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंजवर ते व्यापार करतात. सेबीच्या नियमातंर्गत हा व्यापार करण्यात येतो. सेबीच्या मते, गुंतवणूक नेहमीच नोंदणीकृत मध्यस्थांमार्फत करावी. नोंद नसलेल्या व्यक्तींमार्फत व्यापार केल्यास धोका संभवतो.

डिजिटल सोन्याची खरेदी

गेल्या काही वर्षांत अनेक खासगी कंपन्यांचे ॲप्स आणि संकेतस्थळ आहेत. त्याआधारे ऑनलाईन खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. यामध्ये टाटा समूहाचा कॅरेलटेन, सेफगोल्ड, तनिष्क आणि MMTC-PAMP सारख्या कंपन्या डिजिटल गोल्ड ऑफर देतात. फोनपे, गूगल पे आणि पेटीएम सारखे ॲप सुद्धा या कंपन्यासोबत बाजारात आहेत. अनेक युझर्स या प्लॅटफॉर्मच्या, ॲप्सच्या आणि साईटच्या माध्यमातून ऑनलाईन सोने खरेदीचा पर्याय देतात.