AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO : मोठी आनंदवार्ता! कितीही नोकऱ्या बदला पीएफ खाते ट्रान्सफरची नाही चिंता, नवीन अपडेट कळली का?

EPFO Rules Change : सतत नोकरी बदलणाऱ्यां कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. आता किती वेळा पण नोकरी बदलली तरी पीएफ हस्तांतरणासाठीची किचकट प्रक्रिया करावी लागणार नाही. इतकंच काय त्यांना अर्जफाटे सुद्धा करावे लागणार नाही, काय आहे अपडेट?

EPFO : मोठी आनंदवार्ता! कितीही नोकऱ्या बदला पीएफ खाते ट्रान्सफरची नाही चिंता, नवीन अपडेट कळली का?
ईपीएफओकडून आनंदवार्ता
| Updated on: Nov 09, 2025 | 10:21 AM
Share

EPFO Rules Change : केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेने (EPFO) जवळपास 8 कोटी सक्रीय सदस्यांना मोठी आनंदवार्ता दिली आहे. आता नोकरी बदल्यावर त्यांना ईपीएफ खात्यातील रक्कम हस्तांतरण करण्यासाठी, पीएफ खाते बदलण्यासाठी अर्ज करण्याची गरज उरली नाही. सतत नोकरी बदलणाऱ्यां कर्मचाऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. आता किती वेळा पण नोकरी बदलली तरी पीएफ हस्तांतरणासाठीची किचकट प्रक्रिया करावी लागणार नाही. इतकंच काय त्यांना अर्जफाटे सुद्धा करावे लागणार नाही, काय आहे अपडेट?

ऑटोमॅटिक नवीन खात्यात समावेश

कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली तर जुन्या कंपनीकडे पीएफ खाते हस्तांतरीत करण्यासाठी त्यांना विनंती करावी लागत होती. त्यांना अर्जफाटे करावे लागत होते. जुन्या आणि नवीन कंपनीकडे पीएफ खाते हस्तांतरीत झाले की नाही यासाठी सतत विचारणा करावी लागत होती. पण आता यासर्व झंझटीतून त्यांची मुक्ती झाली आहे.

आता ईपीएफओच्या नवीन नियमानुसार, पीएफ खाते ऑटोमॅटिक पद्धतीने हस्तांतरीत होईल. यापूर्वी ही प्रक्रिया कंपनीच्या मंजुरीनंतर आणि त्याच्या अर्ज फाट्यानंतर करण्यात येत होती. पण आता स्वयंचलित, ऑटोमेटिक पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ही प्रक्रिया थेट ईपीएफओ कार्यालयाकडून करण्यात येईल. यामुळे कर्मचाऱ्यांना आता लांबलचक आणि किचकट प्रक्रियेचा फटका बसणार नाही. त्यांची चिंता कमी झाली आहे.

कंपनीच्या मंजुरीची गरज उरली नाही

यापूर्वी जेव्हा कोणताही कर्मचारी नोकरी बदलत होता. तेव्हा त्याला फॉर्म 13 भरून तो जुन्या नियोक्त्याकडून, कंपनीकडून मंजूर करून घ्यावा लागत होता. ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ होती. पण आता ईपीएफओने ही प्रक्रिया पूर्णपणे सरळ आणि डिजिटल केली आहे. जेव्हा कोणताही कर्मचारी नवीन नोकरी स्वीकारली असेल तेव्हा त्याची नवीन कंपनीच त्याची नोकरीत रुजू होण्याची तारीख (Date Of Joining) अपडेट करेल आणि ईपीएफओ सिस्टिम आपोआप ही प्रक्रिया पूर्ण करेल. यामुळे क्लेम प्रोसिसिंग वेळ खूप वाचणार आहे.

आयुष्यभरासाठी एकच UAN

ईपीएफओने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आयुष्यभरासाठी आता एकच UAN असेल. पूर्वी प्रशासकीय त्रुटीमुळे अनेकदा एकाच कर्मचाऱ्याला दोन दोन युएएन क्रमांक देण्यात येत होते. यामुळे रक्कम काढताना कर्मचाऱ्यांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत होता. आता ईपीएफओने सर्व त्रुटी दूर केल्या आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला एकच युएएन क्रमांक देण्यात आला आहे. त्यामुळे जुनी नोकरी सोडून नवीन नोकरी धरली तरी युएएन क्रमांक बदलणार नाही.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.