
जर तुम्ही इंटरनेट वा मोबाईल बँकींगद्वारे पैसे पाठवत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. देशातील अनेक मोठ्या बँकांनी आता इमिजिएट पेमेंट सर्व्हीस म्हणजे आयएमपीएस (IMPS) वर चार्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे. आयएमपीएस (IMPS) ट्राक्झंशन करणाऱ्या या बँकांच्या ग्राहकांना आता ठरवलेल्या मर्यादेनुसार फी भरावी लागणार आहे. आधी बहुतांश बँका ही सुविधा मोफत पुरवत होत्या.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI)ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. वास्तविक एसबीआयने किरकोळ ग्राहकांसाठी आयएमपीएस (IMPS) ट्राक्झंशनमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. नवीन नियम १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाले आहेत.
२५,००० रुपयांपर्यंत कोणताही चार्ज नाही
२५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत – २ रुपये + जीएसटी
१ लाख रुपये ते २ लाख रुपयांपर्यंत – ६ रुपये + जीएसटी
२ लाख रुपये ते ५ लाख रुपयांपर्यंत – १० रुपये + जीएसटी
१००० रुपयांपर्यत : कोणताही चार्ज नाही
१००० रुपये – १०,००० रुपयांपर्यंत: ३ रुपये + GST
१०,००० रुपये – २५,००० रुपयांपर्यंत: ५ रुपये + GST
२५,००० रुपये – १,००,००० रुपयांपर्यंत: ८ रुपये + GST
१,००,००० रुपये – २,००,००० रुपयांपर्यंत : १५ रुपये + GST
२,००,००० रुपये – ५,००,००० रुपयांपर्यंत : २० रुपये + GST
१००० रुपयांपर्यंत: कोणताही चार्ज नाही
१,००१ रुपये – १,००,००० रुपयांपर्यंत : ब्रँचमध्ये ६ रुपये + GST, ऑनलाईन : ५ रुपये + GST
१,००,००० रुपयांच्यावर : ब्रँचपासून : १२ रुपये + GST, ऑनलाईन: १० रुपये + GST
HDFC बँकचे नवीन चार्ज (१ ऑगस्ट २०२५ पासून लागू )
१,००० रुपयापर्यंत : सर्वसाधारण ग्राहक: २.५० रुपये, वरिष्ठ नागरिक: २.२५ रुपये
१,००० रुपये – १,००,००० रुपयांपर्यंत : सर्वसाधारण ग्राहक: ५ रुपये, वरिष्ठ नागरिक: ४.५० रुपये
१,००,००० रुपयांच्यावर: सर्वसाधारण ग्राहक : १५ रुपये, वरिष्ठ नागरिक: १३.५० रुपये
HDFC बँकेचे Gold आणि Platinum अकाऊंट होल्डर्ससाठी चार्ज द्यावा लागणार नाही
इमिजिएट पेमेंट सर्व्हीस म्हणजे आयएमपीएस ही एक रिअर टाईम पेमेंट सेवा आहे. ही सेवा २४ तास उपलब्ध असते. या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ऑपरेट करते. या सेवेद्वारे ग्राहक कोणत्याही वेळी तातडीने पैसे पाठवू शकतो आणि मिळवू देखील शकतो.