AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

China Gold Policy : दूर की सोच, संकट काळात चीन सोन्याच्या बाबतीत अशा स्ट्रॅटजीने चाललाय सगळं जग हैराण

China Gold Policy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतचं देशवासियांना वर्षभर सोनं खरेदी करु नका असं आवाहन केलं. कारण त्यामुळे परकीय चलनसाठा आणि अर्थव्यवस्थेवरील ताण वाढतोय. पण चीनची स्ट्रॅटजी एकदम बिलकुल या उलट आहे.

China Gold Policy : दूर की सोच, संकट काळात चीन सोन्याच्या बाबतीत अशा स्ट्रॅटजीने चाललाय सगळं जग हैराण
china gold buying stratergy
| Updated on: May 14, 2026 | 9:44 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना वर्षभर सोनं खरेदी करु नका असं आवाहन केलं आहे. सोनं खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात डॉलर खर्च करावा लागतो. परिणामी परकीय चलन साठ्यात घट होत चालली आहे. त्यामुळे मोदी सोनं खरेदी करु नका असं सांगत आहेत. पण चीनची स्ट्रॅटजी बिलुकल या उलट आहे. चीन जगभरातील गोल्ड मार्केटमध्ये एक मोठी शक्ती म्हणून समोर येत आहे. चीनची केंद्रीय बँक सतत मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करत आहे. एप्रिल 2026 पर्यंत सलग 18 व्या महिन्यातही हा सिलसिला कायम होता. चीनच्या या आक्रमक सोनं खरेदीमुळे ग्लोबल मार्केट आणि डॉलर आधारित वित्तीय व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. पीपुल्स बँक ऑफ चायना म्हणजे चीनच्या केंद्रीय बँकेने एप्रिल 2026 मध्ये 8 टन सोनं खरेदी केलं. या सोबतच चीनचा अधिकृत गोल्ड रिझर्व वाढून 7 कोटी 28 लाख ट्रॉय औंस पर्यंत पोहोचला आहे. मार्च अखेरपर्यंत या रिझर्व्हची एकूण किंमत जवळपास 342.76 अब्ज डॉलर आहे.

एक्सपर्ट्सच म्हणणं आहे की, चीनची ही खरेदी फक्त सामान्य गुंतवणूक नाही. यामागे एक दीर्घकालिन आर्थिक आणि रणनितीक विचार आहे. चीनला अमेरिकी डॉलरवरील आपलं अवलंबित्व कमी करायचं आहे. चीनच्या परकीय चलन साठ्याचा मोठा हिस्सा आता सोन्यामध्ये परावर्तित होतोय. अलीकडच्या वर्षातील अमेरिकेसोबतच्या संबंधातील तणाव, प्रतिबंध आणि जागतिक अस्थितरता या पार्श्वभूमीवर चीनने ही नवीन रणनिती स्वीकारली आहे. चीनच्या मते सोनं संपत्ती आहे. कुठलाही देश सोनं फ्रिज करु शकत नाही. भविष्यात आर्थिक प्रतिबंध किंवा जागतिक संकटाची स्थिती गंभीर झाली, तर सोनं त्यांच्यासाठी सुरक्षा कवच म्हणून काम करेल.

लॉन्ग टर्म रणनीतिवर चीनचं काम

त्याशिवाय अजून एक कारण म्हणजे चीनला आपली मुद्रा युआनला अजून मजबूत बनवायचं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलरच्या जागी युआनचा वापर वाढावा अशी चीनची महत्वकांक्षा आहे. अशावेळी मजबूत गोल्ड रिझर्वमुळे त्यांची आर्थिक प्रतिष्ठा अजून वाढेल. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सोन्याच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरु आहेत. तरीही चीनकडून सातत्याने खरेदी सुरु आहे. बीजिंग शॉर्ट टर्म फायद्याचा विचार करत नाहीय. लॉन्ग टर्म रणनीतिवर त्यांचं काम सुरु आहे. चीन स्वत:साठी एक मजबूत आणि सुरक्षित रिझर्व तयार करण्याच्या मिशनवर आहे. पण वाढत्या मागणीचा ग्लोबल मार्केटवर स्पष्ट परिणाम दिसून येतोय. चीन सोबत सामान्य गुंतवणूकदार देखील मोठ्या प्रमाणात खरेदी करतायत.

Follow Us
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत