CNG Rate Today : सीएनजीसह पीएनजीचे दर भडकले, मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार, वाचा नवे दर

| Updated on: Nov 27, 2021 | 11:19 AM

महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर प्राधिकरण कार्यक्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर नवे दर लागू करण्यात आले आहेत.

CNG Rate Today : सीएनजीसह पीएनजीचे दर भडकले, मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार, वाचा नवे दर
सीएनजी
Follow us on

मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडं सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर प्राधिकरण कार्यक्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर नवे दर लागू करण्यात आले आहेत. गेल्या सहा आठवड्यांमधील ही तिसरी दरवाढ आहे. आता मुंबईत 3 रुपये 06 पैशांची वाढ केल्यानंतर सीएनजी प्रति किलो 61.50 रुपयांना मिळेल. तर, पीएनजी गॅसची किमंत 2.26 रुपयांनी वाढवण्यात आल्यानंतर ती 36.50 रुपयांवर पोहोचली आहे.

ऑक्टोबरमध्ये दोनवेळा दरवाढ

सीएनजी आणि पीएनजीच्या दरात 5 ऑक्टोबरला दरवाढ करण्यात आली होती. त्यापूर्वी सीएनजी 54.57 रुपयांना एक किलो मिळत होता. तर, पीएनजी 36 रुपयांना उपलब्ध होत होता. मात्र, 14 ऑक्टोबरला आणखी दरवाढ करण्यात आली होती. त्यावेळी सीएनजीचा दर 57.54 रुपयांवर पोहोचला होता तर पीएनजी 33.93 आणि 39.53 रुपयांवर पोहोचला होता. तर, जुलै महिन्यात सीएनजीचा दर 51.98 आणि पीएनजीच्या एका स्लॅबचा दर 30.40 तर दुसऱ्या स्लॅबचा दर 36.00 रुपये होता.

महानगर गॅस लिमिटेडनं दरवाढीसंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. घरगुती गॅसच्या उपलब्धतेत कमतरता आल्यानं एमजीएलला अधिक दरानं मार्केटमधून नैसर्गिक गॅस खरेदी करावा लागत आहे. सीएनजी आणि पीएनजीची मागणी वाढत असल्यानं महानगर गॅस लिमिटेडला हा निर्णय घ्यावा लागला, असं सांगण्यात आलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत दर कमी

सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली असली तरी पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत दर कमी असल्याचं महानगर गॅसकडून सांगण्यात आलं आहे.

टॅक्सी चालकांची दरवाढ करण्याची मागणी

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनंतर सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढत असल्यानं मुंबईती टॅक्सी चालकांनी दरवाढ करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढल्यास संपावर जाण्याचा इशारा टॅक्सी संघटनांकडून देण्यात आला आहे. टॅक्सी संघटनांकडून भाडेवाढ करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

इतर बातम्या:

Video | भर रस्त्यात आजोंबाचा धमाकेदार डान्स, लोक बघतच राहिले, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

VIDEO | मीडियासमोर पोझसाठी ‘फोटोपिसाट’ बाबांनी थांबवलं, अरबाझ मर्चंटचा डोक्याला हात

cng and png gas rate hiked in Mumbai Maharashtra during last two months