Video | भर रस्त्यात आजोंबाचा धमाकेदार डान्स, लोक बघतच राहिले, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका आजोबांनी अभिनेता समलान खानच्या गाण्यावर ठेका धरला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Video | भर रस्त्यात आजोंबाचा धमाकेदार डान्स, लोक बघतच राहिले, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
dance video

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनके व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ मजेदार असतात. या मंचावर मजेदार आणि खळखळून हसायला लावणारे कंन्टेट तर आवडीने पाहिले जाते. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका आजोबांनी अभिनेता समलान खानच्या गाण्यावर ठेका धरला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

तरुणाचा आजोबांसोबत धमाकेदार डान्स

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ कन्टेंट क्रिएटर तरुण याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तरुण एका आजोबांसोबत धमाकेदार डान्स करताना दिसतोय. तर कशाचीही तमा न बळगता फुटपाथवर उभे राहून एक आजोबा तरुणसोबत डान्स करत आहेत. ओ हो जाने जाने या हिंदी गाण्यावर म्हातारे आजोबा आणि तरुणने ठेका धरलाय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला असून पाहता पाहता त्याला जवळपास पाच लाख लोकांनी लाईक केले आहे. तसेच या व्हिडीओवर नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत. या वयातदेखील आजोबांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर हा डान्स अतिशय छान असल्याचे दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पाहता येईल.

इतर बातम्या :

परळीतील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवण्याची धमकी, यंत्रणा अलर्टवर, पोलिसांचा बंदोबस्त तत्काळ वाढवला

MPSC Chairman | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर राजे-निंबाळकर यांची नियुक्ती

धुळे-नंदुरबार विधान परिषद निवडणूक : भाजपचे अमरिश पटेल बिनविरोध, काँग्रेसच्या गौरव वाणींचा उमेदवारी अर्ज मागे


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI