‘या’ आयटी कंपनीची जोरदार घोडदौड, चालू वर्षातील महसूलात घसघशीत वाढ

IT Company | संचालक मंडळाकडून प्रति समभाग १३ रूपयांच्या अंतरिम लाभांशाची घोषणा. एका १०५ दशलक्ष अमेरिकन डॉलर सहभागासह मोठ्या ३ डील्स मिळवल्या

'या' आयटी कंपनीची जोरदार घोडदौड, चालू वर्षातील महसूलात घसघशीत वाढ
कोफोर्ज
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 12:13 PM

पुणे: कोफोर्ज लिमिटेड या आघाडीच्या जागतिक आयटी उपाययोजना कंपनीने आज 30 जून 2021 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आपल्या वित्तीय निकालांची घोषणा केली. या कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उत्तम आर्थिक आणि कार्यान्वयन कामगिरी नोंदवली असून त्यांनी महसुलातील चांगली वाढ, सुदृढ नफा, विविध मोठ्या आकाराच्या डील्स आणि शाश्वतरित्या चांगल्या नेमणुका नोंदवल्या आहेत. पाहणीअंतर्गत तिमाहीत एसएलके ग्लोबलमधून दोन महिन्यांचे योगदान आणि एप्रिल 2021 च्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण झालेल्या ताब्याचाही समावेश आहे.

• एकत्रित स्वरूपात या तिमाहीचा महसूल 199.7 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आणि 14616 दशलक्ष रूपये होता. 1. डॉलर्समध्ये 42.8 टक्के वाढ आणि रूपयांमध्ये 38.3 टक्के वाढ वार्षिक पातळीवर. 2. डॉलर्समध्ये 16 टक्के वाढ आणि त्यामुळे रूपयांमध्ये 15.9 टक्क्यांची वाढ. • निव्वळ पातळीवर तिमाहीतील महसूल हा 185.1 दशलक्ष डॉलरस होता आणि 13546 दशलक्ष रूपये होता. 1. डॉलरमध्ये 32.3 टक्के वाढ आणि रूपयांमध्ये 28.2 टक्के वाढ, वार्षिक पातळीवर. 2. डॉलर्समध्ये 7.6 टक्के आणि रूपयांमध्ये 7.4 टक्के आणि सातत्यपूर्ण चलनाच्या बाबतीत परिणामात्ममक 7 टक्के. • तिमाहीसाठी एकत्रित स्वरूपात ईबीआयटीडीए वार्षिक पातळीवर 34.8 टक्क्यांनी वाढला असून तिमाही पातळीवर तो 4.2 टक्के वाढला आहे. • पाहणीअंतर्गत असलेल्या तिमाहीत ईबीआयटीडीएमधील नफा (ईएसओपी आणि ताब्याशी संबंधित खर्चांपूर्वी) एकत्रित पातळीवर 16.1 टक्के होता. त्यावर संपूर्ण संस्थेत जगभरात 1 एप्रिलपासून झालेल्या वेतनवाढीचा तसेच इतर खर्चांचा ज्यात व्हिसाचा खर्च आणि मागील सहा महिन्यांत केलेल्या काही साहित्य डील्समधील बदलांचा प्रभाव पडला आहे. • या तिमाहीसाठी करोत्तर नफा (पॅट) एकत्रित पातळीवर डॉलरच्या स्वरूपात 60 टक्क्यांनी वाढून 16.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत गेला आहे आणि वार्षिक पातळीवर तो रूपयांमध्ये 54.7 टक्क्यांनी वाढून 2136 दशलक्ष रूपयांपर्यंत गेला आहे.

जगातील आघाडीची आयटी कंपनी

कोफोर्ज ही एक आघाडीची जागतिक आयटी उपाययोजना कंपनी असून ती आपल्या ग्राहकांना या क्षेत्रातील ज्ञानाबाबत परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि उगवत्या तंत्रज्ञानांना खऱ्या जगातील व्यवसायाच्या परिणामांना साध्य करण्यासाठी मदत करते. अत्यंत निवडक उद्योगांवर लक्ष केंद्रित करणे, या उद्योगांच्या अंतर्गत प्रक्रियांबाबत सखोल माहिती आणि आघाडीच्या प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी यांच्यामुळे आम्हाला खूप फायदा मिळतो. एआय, क्लाऊड आणि इनसाइटवर चालणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर आमच्या उद्योगातील ज्ञानाशी जोडून ग्राहकांच्या व्यवसायाला अत्यंत बुद्धिमान, मोठी वाढ देणाऱ्या उद्योगांमध्ये रूपांतरित करण्यासाठी ही कंपनी काम करते.

कोफोर्जच्या मालकीच्या प्लॅटफॉर्म्समधून वित्तीय सेवा आणि पर्यटन उद्योगांतील महत्त्वाच्या व्यवसाय प्रक्रियांना मदत दिली जाते. कंपनीचे 13000 तंत्रज्ञान आणि प्रक्रिया सल्लागार अभियंते जगभरातील विविध यंत्रणा तयार करतात, सल्ला देतात आणि त्यांचे आधुनिकीकरण करतात. एप्रिल 2021 मध्ये आम्ही कोफोर्जच्या कुटुंबात आणखी 7000 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आणि त्यातून कर्मचाऱ्यांची संख्या 20000 पर्यंत नेली आहे. त्यात एसएलके ग्लोबल सोल्यूशन्स या वित्तीय सेवा उद्योगांना बीपीएम आणि डिजिटल सोल्यूशन्स बिझनेस प्रक्रिया देणाऱ्या परिवर्तन उद्योगातील ताब्यात घेतलेल्या 60 टक्के समभागांमधून आलेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.