महागाईचे रिपोर्ट कार्ड, डाळ-तांदळासह या वस्तूंना दरवाढीचा तडका, इंधन मात्र स्वस्त

चहाशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. चहा तयार करण्यासाठी साखर आणि दुधाची गरज असते. दूध आणि साखरेच्या किंमतीत गेल्या आर्थिक वर्षांत वाढ झाली आहे. तुमच्या थाळीतील इतर पण अनेक पदार्थ महागले आहेत. तर दुसरीकडे एलपीजी, पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहेत.

महागाईचे रिपोर्ट कार्ड, डाळ-तांदळासह या वस्तूंना दरवाढीचा तडका, इंधन मात्र स्वस्त
थाळीत महागले काय काय, महागाईचे रिपोर्ट कार्ड
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 2:30 PM

Inflation Report Card : आर्थिक वर्ष 2023-24 31 मार्च रोजीच संपले. या आर्थिक वर्षात सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागला. टोमॅटो, अद्रक, कांदा, लसूण यांनी नाकीनऊ आणले. सरकारला मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करावा लागला. चहाशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. पण चीन आणि दूधाने जनतेला हैराण केले. किंमतीत मोठी वाढ झाली. इतर अन्नधान्याच्या किंमती पण गगनाला भिडल्या आहेत. तर एलपीजी, पेट्रोल-डिझेलच्या किंमती किंचित कमी झाल्या आहेत. चला पाहुयात काय म्हणते महागाईचे रिपोर्ट कार्ड….

दूधासह साखर झाली महाग

भारतातील अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाशिवाय होत नाही. सध्या दूध आणि साखरेचे भाव वाढलेले आहे. गेल्या काही वर्षांत तर दूधाचे दर दुप्पट झाले आहेत. साखरेच्या भावात पण वाढ झाली आहे. 1 एप्रिल 2023 रोजी दूधाचे भाव 56 रुपये प्रति लिटर होता. आता त्यात तीन रुपयांची वाढ होऊन हा भाव 59 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर साखरेचा भव 41 रुपये प्रति किलो होतो. त्यात 3 रुपयांची वाढ झाली. हा भाव 44 रुपये प्रति किलो इतका झाला आहे.

हे सुद्धा वाचा

गॅस सिलेंडर स्वस्त

चहा अजून महागली असती, जर एलपीजी सिलेंडरचा भाव वाढले असते. पण गेल्या आर्थिक वर्षात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी कपात झाली. मागील आर्थिक वर्षातील 12 महिन्यात 300 रुपयांची कपात झाली. 1 एप्रिल 2023 रोजी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1103 रुपये होती. तर 1 एप्रिल 2024 रोजी हा भाव 803 रुपये होता. 1 एप्रिल 2023 रोजी व्यावसायिक गॅसची किंमत 2,028 रुपये होती तर 1 एप्रिल 2024 रोजी कपातीनंतर दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅसची किंमत 1795 रुपयांवर आली. म्हणजे 233 रुपयांची कपात झाली.

पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कपात

रशिया-युक्रेन युद्धामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता लक्षात येताच, 2022 मध्ये सरकारने एक्साईज ड्यूटी कमी केली. त्यानंतर दीर्घकाळ पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्यात आल्या. 1 एप्रिल 2023 रोजी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा भाव 96 रुपये होता. तर 1 एप्रिल 2024 रोजी हा भाव 94 रुपये होता. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलमध्ये दोन रुपयांची कपात केल्याने किंमती घसरल्या.

तांदळासह डाळी महागल्या

  • तांदळासह डाळी महागल्याने महागाईचा भडका उडाला
  • गहू, ज्वारी आणि इतर अन्नधान्य पण महागले
  • 1 एप्रिल 2023 रोजी तूरडाळ 115 रुपये किलो
  • 31 मार्च 2023 रोजी तूरडाळ 148 रुपये किलोवर, 33 रुपयांची वाढ
  • तांदळाच्या किंमतीत मोठी वाढ
  • 1 एप्रिल 2023 रोजी तांदळाचा भाव 39 रुपये, आता 44 रुपयांच्या पुढे भाव
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.