बोटांच्या इशाऱ्यांवर करणार काम; Realme 12X 5G स्मार्टफोन बाजारात

तुमच्या बजेटमधील Realme 12X 5G हा स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे. 12 हजार रुपयांपर्यंत तुमचे बजेट असेल तर नवीन स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करता येणार आहे. तुम्हाला रिअलमीचा ताज्या दमाचा हा स्मार्टफोन चांगली संधी ठरु शकतो. काय आहेत या फोनची फीचर्स?

बोटांच्या इशाऱ्यांवर करणार काम; Realme 12X 5G स्मार्टफोन बाजारात
स्वस्तात दमदार रिअलमीचा स्मार्टफोन
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 6:48 PM

Realme 12X 5G Smartphone हा भारतीय बाजारात दाखल झाला आहे. रिअलमी कंपनीने हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये 12 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उतरवला आहे. कमी किंमत असली तरी त्यातील फीचर्स दमदार आहे. कमी बजेटच्या फोनमध्ये ग्राहकांना VC कुलिंग सिस्टम मिळत नाही. पण पहिल्यांदा रिअलमीने हा प्रयोग केला आहे. त्यांनी या लेटेस्ट फोनमध्ये VC कूलिंग सिस्टम दिले आहे. या फोनची इतर वैशिष्ट्ये काय आहेत, जाणून घेऊयात..

एअर जेस्चर फीचर

या फोनच्या समोरील बाजूस ग्राहकांना कोमिनी कॅप्सूल 2.0 फीचर पाहायला मिळेल. हे फीचर Apple Dynamic Island ची आठवण करुन दिल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय या फोनमध्ये ग्राहकांना एअर जेस्चर फीचर मिळेल. या फीचरच्या मदतीने तुम्ही या फोनला टच न करता सहजरित्या नियंत्रीत करु शकता. तुम्हाला या फोनला हात न लावता तुमच्या इशाऱ्यावर कमांड देता येतील.

हे सुद्धा वाचा

Realme 12X 5G Specifications :

  1. डिस्प्ले : या फोनमध्ये 6.72 इंचची फुल-एचडी रिझॉल्यूशनचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तो 950 निट्स पीकचा ब्राईटनेस आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्टसह मिळेल. या फोनमध्ये 950 निट्स पीक ब्राइटनेस मिळेल.
  2. चिपसेट : गतीसह वैविध्यपूर्ण कामांसाठी रिअलमी ब्रँडच्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6100 प्लस प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.
  3. बॅटरी क्षमता : या ताज्या दमाच्या बजेट स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. हा स्मार्टफोन 45 वॅट फास्ट चार्ज सपोर्ट करते. कंपनीच्या दाव्यानुसार 30 मिनिटांमध्ये हा स्मार्टफोन 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो.
  4. ऑपरेटिंग सिस्टम : हा लेटेस्ट फोन अँड्राईड 14 वर काम करतो.
  5. इतर खास फीचर्स : या फोनमध्ये रियलमीने एअर जेस्चर फीचर दिले आहे. तुम्ही स्क्रीनला टच न करता हाथांच्या इशाऱ्यांनी कंट्रोल करु शकता. या स्मार्टफोनमध्ये आवाजाची गुणवत्ता पण चांगली आहे. यामध्ये ड्युएल स्पीकर्स देण्यात आले आहेत.
  6. कॅमेरा सेटअप : या फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सल प्रायमरी एआय कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सोबत 2 मेगापिक्सल सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.
  7. रॅम आणि स्टोरेज : फोनमध्ये 8 जीबी रॅम देण्यात आली आहे. पण तितक्या व्हर्च्युअ रॅमच्या मदतीने तुम्ही रियलमी फोनची रॅम 16 जीबीपर्यंत वाढवू शकतात. याशिवाय फोटो, व्हिडिओ आणि ॲप्स इन्स्टॉल करण्यासाठी फोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 2 टीबीपर्यंत वाढविण्यात आले आहे.

Realme 12X 5G Price in India :

  • रिअलमी मोबाईल फोनचे तीन व्हेरिएंट्स बाजारात उतरविण्यात आले आहेत.
  • 4 जीबी रॅम सह128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे.
  • 6 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंटची किंमत 13499 रुपये
  • तर 8 जीबी रॅम /128 जीबी स्टोरेजच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे.
Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.