Explainer : अमेरिका पडली एकाकी, रशिया आणि युरोप एकत्र येणार ? कोणाची ताकद किती ?
ग्रीनलँडवरुन अमेरिका आणि युरोपीयन देशात ज्याप्रकारे अंतर वाढत आहे त्यावरुन भविष्यात कदाचित नाटोचे देश रशियाच्या बाजूने आले तर जगात काय घडू शकते. कोणत्या गटाकडे किती ताकद आणि सैन्य ताकद आहे हे पाहूयात...

अमेरिका आणि युरोपात ग्रीनलँडवरुन फूट पडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वक्रदृष्टी ग्रीनलँडवर पडल्याने दुसरीकडे फ्रान्स, इटली आणि जर्मनी यांची रशियाशी जवळीक वाढण्याचे संकेत मिळाले आहेत. जर जगातील सर्वात मोठी सैन्य शक्ती अमेरिका एका बाजूला आणि दुसरीकडे अशक्यप्राय वाटणारे रशिया आणि युरोप यांची आघाडी झाली तर जगात काय होईल ? ज्यात अमेरिका आणि तुर्की वगळून NATO चे इतर देश जर एकटवले तर तर कोणाची ताकद जास्त असेल . अनेक अब्ज डॉलरचे डिफेन्स बजेट असलेला अमेरिका आणि विघटनानंतर कमकूवत झालेल्या रशिया आणि इतर नाटो देशांचा मुकाबला करु शकेल का ? पाहूयात कोणात किती ताकद ?
अमेरिका हा जगातील सर्वात मोठी आर्थिक शक्ती असलेला पॉवरफूल देश आहे. आकाशातील युद्धात अमेरिकेस बरोबरी करणारा कोणताही देश सध्या पृथ्वीतलावर नाही. हजारो फायटर विमाने आणि अणू इंधनावर चालणाऱ्या विमान नौकाचा ताफा पदरी असलेला सुपर पॉवर अमेरिका हजारो किलोमीटर दूरवर युद्धात एखादा देश बेचिराख करु शकतो.
अमेरिकेचे डिफेन्स बजेट नेमके किती ?
साल २०२५ चे अमेरिकेचे संरक्षण बजेट सुमारे ९३५ अब्ज अमेरिकन डॉलर हून अधिक आहे. अमेरिकेचे संरक्षण बजेट इतके जास्त आहे की भारताच्या संरक्षण बजेटच्या दहा पट जास्त आहे.हे युरोप आणि रशियांच्या डिफेन्स बजेटच्या एकत्रित बेरजेपेक्षा जास्त आहे. रशियाने साल २०२४ मध्ये आपले सैन्य बजेट वेगाने वाढवलेले आहे. तरीही ही आघाडी अमेरिकेच्या डिफेन्स बजेटच्या केवळ ६५-७० टक्क्यांनाच टच करु शकते.
सैनिक-टँकच्या बाबतीत रशिया आणि यूरोप पुढे
अमेरिका आणि रशिया आणि युरोपच्या आघाडीची तुलना करता सैन्य आणि रणगाड्यांच्या बाबतीत भारी पाडू शकते. एकट्या रशियाकडेच १३ लाखांहून जास्त सक्रीय सैनिक आहेत. रशियाकडे जगातील सर्वात मोठा रणगाड्या आणि चिलखती सैन्य वाहनांचा ताफा आहे. काही टँक जुन्या पिढीचे असले तरी रशिया पायदलाच्या बाबतीत अजूनही सुपर पॉवर आहे. युरोपीयन देशातील १८ सक्रीय सैनिक जोडून जर युरेशियाच्या जमीनीवर दोन्ही गटात युद्ध झाले तर रशिया-युरोपच्या आघाडीकडे ३१ लाख सैन्य असतील. रशिया आघाडीकडे सुमारे १४ हजार टँक आहेत आणि अमेरिकेकडे सुमारे ४ हजार ६०० टँक आहेत.
आकाशी युद्धात अमेरिका ताकदवान
आकाशातील युद्धात मात्र अमेरिका सुपरपॉवर आहे. अमेरिका जगाच्या कोणत्याही देशात युद्ध आघाडी सुरु करु शकते. अमेरिकेकडे 5Th जनरेशनचे शेकडो स्टील्थ फायटर जेट्स आहेत. यात F-35 आणि F-22 या जेट फायटर्सचा समावेश आहे. तर रशियाकडे खतरनाक एअर डिफेन्स सिस्टीम आहे. याशिवाय युरोपकडील बहुतांशी जेट फायटर 4.5 जनरेशनचे आहेत. अमेरिकेकडे सुमारे १३,२०० एअरक्राफ्ट आहेत. तर युरोप आणि रशिया आघाडीकडे केवळ ७,७०० जेट फायटर आहेत.
समुद्राची लढाईत कोणाची बाजी
समुद्रावर अमेरिकेची हुकूमत आहे.कारण अमेरिकेकडे ११ विमानवाहू युद्ध नौका आहेत. जे जगातील कोणत्याही कोपऱ्यात लढाईत निर्णयाक वर्चस्व मिळवून देऊ शकतात. अमेरिकेकडे ६४ न्युक्लिअर सबमरीन आहेत. तर रशिया – युरोप आघाडीकडे १२० न्युक्लिअर सबमरीन आहेत. परंतू रशिया आघाडीकडे न्युक्लिअर आणि डिझेल असा मिक्स पाणबुड्या आहेत. या आघाडीकडे एकूण ६ विमानवाहू नौका आहेत.
अण्वस्रांची तुलना
अमेरिकेतील अण्वस्रांची तुलना करायची झाली तर जगातला सर्वात मोठा आण्विक भांडार रशियाकडे आहे. ब्रिटन आणि फ्रान्सला जोडले तर रशियाआघाडीकडे ६००० हून अधिक अणूबॉम्ब होतील.अमेरिकेकडे सुमारे ५,०४४ आण्विक शस्रे आहेत. ही आण्विक अण्वस्रांचा वापर अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर केला होतो. त्यानंतर जगात कुठेही कोणी कोणावर हे शस्र वापरलेले नाही. या अण्वस्रांनी जगाचा विनाश होऊ शकतो. त्यामुळे मानव जातच हरुन जाईल.
पायदळ आणि शस्रास्रांची तुलना करता हे सांगणे कठीण आहे की युद्धात कोण जिंकू शकते. कारण अनिश्चितेच्या या वातावरणात जगात देशांचे परस्पर संबंध बिघडत आणि तसेच नवीन संबंध बनत आहेत. रशिया आणि युरोप एकत्र आले तर आक्रीतच घडेल. आता केवळ ग्रीनलँडवरुन अमेरिकेच्या विरोधात जग गेले आहे. सध्या केवळ युरोपीयन नेते आणि पुतिन यांच्याकडे वक्तव्य होत आहेत. जगात अनेकदा मानसिक युद्धातही कोणीही बलाढ्य देशावरही विजय मिळवू शकतो. व्हिएतनाम युद्धात बलाढ्य अमेरिकेला माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे केवळ शस्रास्रे असणे म्हणजे युद्धात बाजी मारणे शक्य होईलच असे नाही.
