कोरोनाचा हाहा:कार, जगातील 500 श्रीमंतांनी 32 लाख 4 हजार 570 कोटी रुपये गमावले, बेजोस, गेट्सचं सर्वाधिक नुकसान

| Updated on: Feb 29, 2020 | 5:29 PM

कोरोना विषाणूमुळे गुंतवणूकदारांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. गेला आठवडा जगातील अरबपतींसाठी मोठा नुकसानदायक ठरला.

कोरोनाचा हाहा:कार, जगातील 500 श्रीमंतांनी 32 लाख 4 हजार 570 कोटी रुपये गमावले, बेजोस, गेट्सचं सर्वाधिक नुकसान
Follow us on

मुंबई : जीवघेण्या कोरोना विषाणूचा फटका मोठा प्रमाणात (Corona Virus Affect Share Bazaar) शेअर बाजाराला बसताना दिसत आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांवरही याचा विपरित परिणाम पाहायला मिळत आहे. गेला आठवडा हा जगातील बहुतेक गुंतवणूकदारांसाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखा होता. या दरम्यान, अनेक गुंतवणूकदारांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. हा आठवडा जगातील अरबपतींसाठीही मोठा नुकसानदायक ठरला.

न्यूज एजन्सी ब्लुमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे शेअर (Corona Virus Affect Share Bazaar) बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे जगभरातील 500 सर्वात श्रीमंत लोकांनी जवळपास 444 अब्ज डॉलर म्हणजेच 32 लाख 4 हजार 570 कोटी रुपये गमावले. या रिपोर्टनुसार, Dow Jones Industrial Average मध्ये गेल्या आठवड्यात 12 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. वर्ष 2008 च्या आर्थिक संकटानंतर  पाच दिवसांच्या सत्रातील ही सर्वात मोठी घसरण आहे. यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.

बेजोस आणि बिल गेट्स यांना सर्वात जास्त नुकसान

Bloomberg Billionaires Index च्या अहवालानुसार, जगातील तीन सर्वात श्रीमंत व्यक्ती Amazon.com चे जेफ बेजोस, Microsoft चे बिल गेट्स आणि LVMH चे संचालक बर्नार्ड अरनॉल्ट यांना गेल्या आठवड्यात सर्वाधिक नुकसान झालं. या तिघांची संपत्ती गेल्या आठवड्यात 30 अब्ज डॉलर म्हणजेच 2 लाख 16 हजार 525 कोटी रुपयांनी कमी झाली आहे.

Elon Musk चं मोठं नुकसान

जगातील 25 व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांना 9 अब्ज डॉलर म्हणजेच 6 लाख 49 हजार 575 कोटी रुपयांचं नुकसान झालं. त्यांची कंपनी Tesla Inc. च्या शेयर्समध्ये वर्षाच्या सुरुवातीला झपाट्याने वाढ झाली. मात्र, आता त्यांच्यात घसरण झाल्याने मस्क यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्याच्याकडे 36.3 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 2 लाख 61 हजार 995 कोटी रुपये  इतकी संपत्ती आहे.

ब्लूमबर्गच्या संपत्तीच्या रँकिंगमध्ये 80% अरबपतींच्या (Corona Virus Affect Share Bazaar) संपत्तीत या वर्षी मोठी घसरण झाली आहे.