Credit card : क्रडिट कार्ड वापरत असला तर ही बातमी वाचाच, क्रेडिट कार्ड वापरताना हे नियम नक्की पाळा…

क्रेडिट कार्ड वापरत असाल तर खिसा रिकामा होऊ नये यासाठी काही गोष्टी अवर्जून पाळा आणि होणारा तोटा टाळा. ज्या दिवशी तुम्ही रक्कम काढाल त्या दिवसापासून तुम्हाला व्याजाची रक्कम भरावी लागेल.

Credit card : क्रडिट कार्ड वापरत असला तर ही बातमी वाचाच, क्रेडिट कार्ड वापरताना हे नियम नक्की पाळा...
क्रेडिट कार्ड

मुंबई : क्रेडिट कार्ड वापरत असाल तर खिसा रिकामा होऊ नये यासाठी काही गोष्टी अवर्जून पाळा आणि होणारा तोटा टाळा. क्रेडिट कार्डमधून कॅश काढण्याची चूक कधीही करू नका, कारण त्यामुळे तुम्ही तुमचा व्याजमुक्त वेळ म्हणजेच इन्ट्रेस्ट फ्री पिरीयड गमावून बसाल. त्याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही प्रकारचे पैसेही भरावे लागतील. त्यामुळे खिशाला मोठी झळ लागू शकते. आजच्या घडीला क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही खरेदीनंतर काही काळ बिनव्याजी काळ मिळतो. त्याचा योग्य वापर केल्यास मोठ्या  तोट्यापासून वाचू शकता.

नियम योग्यरित्या समजून घ्या

प्रत्येक क्रेडिट कार्डमधून काही ठराविक रक्कमच काढता येते. त्यानंतर तुम्हाला त्याचंं बिल येतं, ते भरण्यासाठी साधारण 20 दिवसांचा अवधी मिळतो. जर तुम्ही वेळेत रक्कम भरली तर तुम्हाला कोणतीही अतिरिक्त रक्कम भरावी लागणार नाही. आर्थिक जाणकारांच्या मतानुसार जर तुम्ही क्रेडिट कार्डचा 30 टक्के वापर केला आणि रक्कम वेळेत भरल्यास तुमचा सीबील स्कोर चांगला होतो.

रक्कम काढल्यास व्याजाचे नियम काय?

ज्या दिवशी तुम्ही रक्कम काढाल त्या दिवसापासून तुम्हाला व्याजाची रक्कम भरावी लागेल.जोपर्यंत तुम्ही पूर्ण रक्कम जमा करत नाही तोपर्यंत तुम्हाला व्याज लागू असेल. रक्कम काढल्यानंतर तुमचं क्रडिट लिमीटही कमी होईल. ज्यावेळी तुम्ही रिपेमेंट म्हणजेच रक्कम जमा करत असता त्यावेळी तुम्हाला मिनिमम पेमेंटचाही पर्याय मिळतो. मिनिमम पेमेंट करण्यापासून वाचा, कारण तसं केल्यास तुम्हाला अतिरिक्त व्याज भरावं लागेल. त्यामुळे मोठी झळ बसू शकते.

Nagpur हवाला व्यापाऱ्यांवर सर्जीकल स्ट्राईक, 84 लाखांची रोकड कुठून केली जप्त?

Video: अंगाला जखमा, हातात काठी, गळ्यात सलाईनची बाटली, तरीही लग्नात जबरदस्त डान्स, पाहा लग्नातील भन्नाट व्हिडीओ

नियमित कोरफडीचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा याबद्दल सविस्तर!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI