AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या मोबाईलमध्ये ‘Govt Yojana’चा हा मेसेज आलाय, मग व्हा सावध अन्यथा…!

ऑनलाईन फसवणूक करणारे स्मार्टफोन वापरकर्त्यांची फसवणूक करण्याचा सतत प्रयत्न करत असतात, त्यासाठी तो रोज नवनवे मार्ग शोधतो. आता अशाच फसवणुकीसंदर्भात PIB ने इशारा जारी केलाय.

तुमच्या मोबाईलमध्ये 'Govt Yojana'चा हा मेसेज आलाय, मग व्हा सावध अन्यथा...!
business news in marathi
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Aug 28, 2021 | 12:46 PM
Share

नवी दिल्ली : जर तुमच्या मोबाईलमध्ये ‘Govt Yojana’च्या नावाने मेसेज आला असेल तर तुम्हाला त्वरित सतर्क झाले पाहिजे. कारण या मेसेजद्वारे तुम्ही फसवणुकीचे शिकार होऊ शकता. सोशल मीडियावर एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, सरकारी योजनेंतर्गत तुमच्या खात्यात 2.67 लाख रुपये जमा झालेत.

फसवणुकीसंदर्भात PIB कडून इशारा जारी

ऑनलाईन फसवणूक करणारे स्मार्टफोन वापरकर्त्यांची फसवणूक करण्याचा सतत प्रयत्न करत असतात, त्यासाठी तो रोज नवनवे मार्ग शोधतो. आता अशाच फसवणुकीसंदर्भात PIB ने इशारा जारी केलाय.

हा दावा मेसेज केला जातोय

सरकारी ‘Govt Yojana’अंतर्गत तुमच्या खात्यात 2.67 लाख रुपये जमा झालेत. जर तुम्हाला पैसे घ्यायचे असतील तर लगेच खालील लिंकवर क्लिक करा. मेसेजच्या शेवटी एक लिंक दिलीय. जेव्हा भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकने या मेसेजची तपासणी केली, तेव्हा असे आढळून आले की, ते पूर्णपणे बनावट आहे. अशी कोणतीही योजना सरकारकडून चालवली जात नाही.

पीआयबी फॅक्ट चेकने केले हे ट्विट

पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट केले आणि लिहिले की, तुम्हाला सरकारी योजनेंतर्गत तुमच्या खात्यात 2,67,000 रुपये जमा झाल्याचा दावा करणारा मेसेज प्राप्त झाला आहे का? जर होय तर काळजी घ्या. हा मेसेज पूर्णपणे बनावट आहे. भारत सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही.

पीआयबीने लोकांना हा सल्ला दिला

हा दावा #PIBFactCheck मध्ये बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पीआयबीने अशा कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी लोकांना त्यांचे योग्य परिश्रम करण्याचा सल्ला दिलाय. केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रत्येक योजनेची माहिती संबंधित मंत्रालयाने आधीच जारी केलीय. म्हणून संबंधित मंत्रालयाची वेबसाईट, पीआयबी आणि इतर विश्वसनीय माध्यमे तपासल्यानंतरच प्रत्येक योजनेसाठी अर्ज करा. असेही म्हटले गेले आहे की, जर तुम्ही कोणत्याही बनावट बातम्यांच्या जाळ्यात अडकलात तर तुम्हाला नफ्याऐवजी आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.

आपण फॅक्ट चेक देखील करू शकता

जर तुम्हालाही असा काही मेसेज आला, तर तुम्ही तो PIB ला पाठवू शकता, तथ्य तपासण्यासाठी https://factcheck.pib.gov.in/ किंवा whatsapp नंबर +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com. ही माहिती PIB वेबसाईट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या

PMJDY: 43.04 कोटी जन धन बँक खाती 7 वर्षांत उघडली, जाणून घ्या त्यांच्यात किती पैसे जमा?

PM Kisan : चांगली बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात आता 6000 ऐवजी 12000 येणार, जाणून घ्या कसे?

credited rs 267000 message of ‘Govt Yojana’ has arrived in your mobile, so be careful otherwise

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?