AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : 80 डॉलरपर्यंत पोहचले कच्चे तेल, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल महागले तर नाही ना

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाने उसळी घेतली आहे. कच्चा तेलाचे भाव 80 डॉलरपर्यंत पोहचले आहेत. तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल महागले काय, काय आहे आजचा भाव

Petrol Diesel Price Today : 80 डॉलरपर्यंत पोहचले कच्चे तेल, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल महागले तर नाही ना
आजचा भाव काय
| Updated on: Apr 02, 2023 | 8:31 AM
Share

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाने उसळी घेतली आहे. कच्चा तेलाचे भाव 80 डॉलरच्या घरात गेले आहे. या नव्या वर्षात कच्चा तेलाच्या (Crude Oil Price) आघाडीवर मोठा दिलासा होता. दोन अडीच महिन्यांपासून कच्चा तेलाचे भाव सातत्याने घसरत होते. युक्रेन युद्धापासून भारताने रशियाकडून इंधनाची आयात वाढवली आहे. इतर कच्चा तेलापेक्षा भारताला रशियाकडून 2 डॉलर प्रति बॅरल स्वस्तात इंधन मिळत आहे. रशियाने जागतिक बाजारात दबाव झुगारण्यासाठी जूनपर्यंत उत्पादन घटवले आहे. तर तुर्कीने एका प्लँटमधून उत्पादन कमी केले आहे. अमेरिका आणि युरोपातील घडामोडींचा परिणाम कच्चा तेलाच्या किंमतीवर दिसून येत आहे. तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price Today) महागले काय, काय आहे आजचा भाव

भारतात गेल्या वर्षी 22 मे रोजी केंद्र सरकारने कर कपात केली. तेव्हापासून इंधनाच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 1.75 टक्के वधारले. आज या इंधनाची किंमत 75.67 डॉलर प्रत‍ि बॅरलवर पोहचल्या. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 1.64 टक्क्यांनी वाढून 79.89 डॉलर प्रत‍ि बॅरलवर पोहचले.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.21 तर डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.70 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 106.77 पेट्रोल आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.50 आणि डिझेल 93.99 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.09 आणि डिझेल 92.64 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.17 आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.20 रुपये तर डिझेल 92.74 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...