AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : एक लिटर पेट्रोल-डिझेलचा भाव काय, एका एसएमएसवर घ्या जाणून

Petrol Diesel Rate Today : जागतिक बाजारात कच्चा तेलाची घसरगुंडी उडाली आहे. एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी इतके रुपये लागतील, एका एसएमएसवर जाणून घ्या काय आहे भाव

Petrol Diesel Rate Today : एक लिटर पेट्रोल-डिझेलचा भाव काय, एका एसएमएसवर घ्या जाणून
आजचा भाव काय
| Updated on: May 31, 2023 | 8:31 AM
Share

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलाची (Crude Oil) घसरगुंडी उडाली आहे. गेल्या आठवड्यापासून दरवाढ सुरु होती. भाव घसरल्याने तेल कंपन्यांना आज दिलासा मिळाला. डॉलर मजबूत होत असल्याने त्याचे परिणाम दिसून येत आहे. सौदी अरेबियासह इतर तेल उत्पादक देश भारतीय बाजारपेठेकडे आशेने पाहत आहेत. युरोपियन देशांना भारतीय तेल उत्पादक कंपन्या क्रूड ऑईलचा पुरवठा करत आहेत. त्याचा फायदा या कंपन्यांच्या पदरात पडत आहे. भारतीय सर्वसामान्य ग्राहकांना अजूनही किंमतीविषयी दिलासा मिळाला नाही. एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी (Petrol Diesel Price) इतके रुपये लागतील, एका एसएमएसवर जाणून घ्या काय आहे भाव

इंधन होईल स्वस्त सूत्रांच्या माहितीनुसार. पेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच कमी होतील. पुढील 6 महिन्यात हळूहळू पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील. तज्ज्ञांच्या मते, सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 20 रुपयांची कपात होण्याची संभावना आहे. ही कपात एकदाच होणार नाही. तर टप्प्याटप्प्याने ही कपात करण्यात येईल.

जून महिन्यात पहिली कपात मे महिन्यात कर्नाटक राज्यातील निवडणूक आहे. त्यानंतर 4 राज्यातील निवडणूका होतील. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणूका होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार पेट्रोल-डिझेल कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे. याच कालावधीत इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे.

कच्चा तेलाची घसरगुंडी आज 31 मे रोजी, कच्चा तेलाच्या किंमतीत किंचित वाढ दिसून आली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) आता 69.56 डॉलर प्रति बॅरलवर घसरले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) भाव 73.54 डॉलर प्रति बॅरल झाले.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.53 तर डिझेल 93.03 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.23 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 106.75 पेट्रोल आणि डिझेल 93.24 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.17 आणि डिझेल 92.70 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 105.89 रुपये आणि डिझेल 92.42 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 108.79 तर डिझेल 95.21 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.77 आणि डिझेल 92.30 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 105.80 आणि डिझेल 92.30 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.49 रुपये तर डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 105.97 रुपये तर डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?