AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाने उडवली झोप! परभणीसह अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेल महाग

Petrol Diesel Price Today : कच्चे तेल लवकरच रडविण्याची शक्यता आहे. कच्चा तेलाने पेट्रोलियम कंपन्यांची झोप उडवली आहे. लवकरच त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसू शकतो

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाने उडवली झोप! परभणीसह अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेल महाग
आजचा भाव काय
| Updated on: Apr 07, 2023 | 8:37 AM
Share

नवी दिल्ली : ओपेक+ देशांसह रशियाने (OPEC Russia) कच्चा तेलाचे उत्पादन घटविल्याने पेट्रोलियम कंपन्यांसमोर अंधारी आली आहे. भावाने मुसंडी मारल्याने या कंपन्याची झोप उडाली आहे. गेल्या वर्षभरापासून या कंपन्यांना रशियाकडून स्वस्तात इंधनाचा पुरवठा होत आहे. तर केंद्र सरकारने पण या कंपन्यांना नुकसान भरपाई भरुन काढण्यासाठी कोट्यवधींचे पॅकेज दिले होते. आता रशिया पण कच्चा तेलाच्या किंमती वाढवू शकतो. त्याचा परिणाम देशातील जनतेवर पडू शकतो. देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) भडकण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम ही काही शहरातील भावावरुन दिसून येत आहे.

आज काय आहेत भाव आज शुक्रवारी, 7 एप्रिल रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 80.70 डॉलरवर पोहचल्या. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 85.12 डॉलर प्रति बॅरलवर आहे. या दरवाढीमुळे देशातील काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पण बदल झाला आहे. देशातील तेल विपणन कंपन्या दर दिवशी सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जाहीर करतात. देशात गेल्या वर्षी 22 मे रोजी केंद्र सरकारने कर कपात केली. तेव्हापासून इंधनाच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. राज्यात परभणी, बीड, नांदेड या ठिकाणी पेट्रोलच्या किंमती महाग आहेत. अनुक्रमे 109.01, 108.04 108.08 रुपये प्रति लिटर भाव आहे.

रशियाच्या निर्णयावर दरवाढ एप्रिल ते डिसेंबर 2022 या दरम्यान भारताने एकूण 1.27 अब्ज बॅरल तेल खरेदी केले. यामधील जवळपास 19% कच्चे तेल रशियाकडून आलेले होते. या नऊ महिन्यात भारताने सौदी अरब आणि इराक पेक्षा रशियाकडून जास्त कच्चा तेलाची खरेदी केली. त्यामुळे भारताला प्रति बॅरल 2 डॉलरचा फायदा झाला आहे. आता रशिया काय निर्णय घेतो, त्यावर पुढील दरवाढ अटळ असेल.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.97 तर डिझेल 93.46 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.24 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.48 तर डिझेल 93.97 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.24 पेट्रोल आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.87 आणि डिझेल 94.32 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.58 आणि डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.45 तर डिझेल 93.93 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.23 तर डिझेल 92.77 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.08 तर डिझेल 94.56 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.18 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.24 आणि डिझेल 92.75 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.33 रुपये तर डिझेल 92.86 रुपये प्रति लिटर

उत्पादन घटवले

  1. ओपेक आणि रशियाचा कच्चा तेलाच्या उत्पादनात कपातीचा निर्णय
  2. 1 दशलक्ष कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्यात येईल
  3. सौदी अरब प्रति दिवस 5 लाख बॅरल कपात करणार
  4. इराक प्रति दिवस 211,000 बॅरल कच्चा तेलाचे उत्पादन घटविणार
  5. संयुक्त अरब अमिरात 144,000 बॅरल प्रति दिवस कपात करणार
  6. कुवेत 128,000 बॅरल तर अल्गेरिया 48 हजार बॅरलचे उत्पादन घटविणार
  7. ओमानने 40,000 हजार बॅरल प्रति दिवस कपातीचा निर्णय घेतला आहे.
  8. त्यामुळे ब्रेंट क्रूड ऑईलच्या भावात 6 टक्के वाढ झाली

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.