AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाच्या भाव वाढीला ब्रेक, आज पेट्रोल-डिझेल झाले का स्वस्त

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाने महागाईला आमंत्रण दिले आहे. या आठवड्यात कच्चा तेलाने एकदम मुसंडी मारली. ओपेक+ देशांसह रशियाने कच्चा तेलाचे उत्पादन घटविल्याने मोठा फटका बसला. आज भावात नरमाई आहे.

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाच्या भाव वाढीला ब्रेक, आज पेट्रोल-डिझेल झाले का स्वस्त
आजचा भाव काय
| Updated on: Apr 06, 2023 | 8:32 AM
Share

नवी दिल्ली : कच्चा तेलाने (Crude Oil) महागाईला आमंत्रण दिले आहे. या आठवड्यात कच्चा तेलाने एकदम मुसंडी मारली. ओपेक+ देशांसह रशियाने कच्चा तेलाचे उत्पादन घटविल्याने मोठा फटका बसला. देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) भडकण्याची भीती आहे. जगातील तेल उत्पादक देशांची संघटना OPEC ने कच्चा तेलाच्या उत्पादनात कपात केली. तर रशियाने यापूर्वीच तेल कपातीचे शस्त्र उगारले होते. आता चीनमध्ये इंधनाचा खप वाढल्याने कच्चा तेलाची मागणी वाढली आहे. आता येत्या काही दिवसात भारताला रशियाकडून स्वस्तात मिळणाऱ्या इंधनाच्या किंमती पण वधारण्याची भीती आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारात दिसून येईल. यामुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.

आज दरवाढीला ब्रेक देशात गेल्या वर्षी 22 मे रोजी केंद्र सरकारने कर कपात केली. तेव्हापासून इंधनाच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. इंधनाच्या दरवाढीला आज 6 एप्रिल रोजी ब्रेक लागला. आज किंमतीत वाढ न होता घसरण झाली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलची (WTI Crude Oil) किंमत 80.44 डॉलर प्रत‍ि बॅरलवर आल्या. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 85.84 डॉलर प्रत‍ि बॅरलपर्यंत घसरल्या.

पेट्रोल-डिझेलची महागाई सौदी अरबसह 23 देशांनी कच्चा तेलाचे उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला. सोमवारी याविषयीची घोषणा करण्यात आली. हे सर्व देश मिळून 19 कोटी लिटर कच्चा तेलाच्या उत्पादनात कपात करतील. त्यामुळे इंधनाची किंमती प्रति बॅरल 10 डॉलरपर्यंत वाढतील. त्याचा भारतासह जगावर थेट परिणाम होईल. म्हणजे येत्या काही दिवसात देशात पेट्रोल-डिझेल महाग होईल.

भारतावर काय होईल परिणाम एप्रिल ते डिसेंबर 2022 या दरम्यान भारताने एकूण 1.27 अब्ज बॅरल तेल खरेदी केले. यामधील जवळपास 19% कच्चे तेल रशियाकडून आलेले होते. या नऊ महिन्यात भारताने सौदी अरब आणि इराक पेक्षा रशियाकडून जास्त कच्चा तेलाची खरेदी केली. त्यामुळे भारताला प्रति बॅरल 2 डॉलरचा फायदा झाला आहे.

कोणत्या देशाकडून होतो पुरवठा

  1. सध्या रशियाकडून भारताला रोज 16 लाख बॅरल्स कच्चा तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे
  2. तर इराककडून 9.4 लाख बॅरल, सौदी अरबकडून 6.5 लाख बॅरल कच्चे तेल आयात होते
  3. संयुक्त अरब अमिरातकडून 4 लाख बॅरल, अमेरिकेकडून 2.5 लाख बॅरल प्रत्येक दिवशी पुरवठा होत आहे
  4. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे
  5. वर्षभरात भारतीय तेल कंपन्यांना इतर पुरवठादारांपेक्षा रशियकडून 2 डॉलर प्रति बॅरलचा फायदा होत आहे.

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना