Multibagger Stock : 3 महिन्यात पैसा दुप्पट; सोमवारी पुन्हा मोठी झेप घेणार? या Share वर गुंतवणूकदारांचं लक्ष
Multibagger Stock : या स्टॉकने गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाई करून दिली. या कंपनीने 5 वर्षात 1939 टक्क्यांचा परतावा दिला. क्युपिड लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. सोमवारी या कंपनीकडं गुंतवणूकदारांचं लक्ष्य असेल. या कंपनीने पुढील वर्षासाठी मोठ्या योजनेची घोषणा केली आहे.

5 वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीत गुंतवणूक केली आणि ती काढली नाही. त्यांना मोठा फायदा झाला. या काळात कंपनीचा शेअर 1939 टक्क्यांनी वधारला. क्यूपीड लिमिटेड(Cupid limited Share) कंपनीचा शेअर सध्या चर्चेत आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनी इतिहास रचणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचं या कंपनीकडे लक्ष वेधले आहे. सोमवारी हा शेअर काय कामगिरी बजावतो याकडे तज्ज्ञांचं पण लक्ष आहे. हा शेअर चांगला धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
व्यवसायात भरारी घेणार
26 सप्टेंबर रोजी क्यूपीडचे संचालक आदित्य कुमान यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत कंपनी इतिहास रचणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी कंपनीचं उत्पादन, जोमाने होणारी आर्थिक वाढ, एफएसीजी सेक्टरमधील तेजी यावर त्यांचं मत व्यक्त केलं. सध्या कंपनी त्यांच्या व्यावसायिक आघाड्यांवर चांगली कामगिरी बजावत असल्याचे कंपनीने सांगितले.
एका वर्षात कशी कामगिरी?
शुक्रवारी क्युपीड लिमिटेडचा शेअर 1.51 टक्क्यांनी घसरला. बीएसईवर हा शेअर 215.55 रुपयांवर बंद झाला. 1 महिन्यात कंपनीने गुंतवणूकदारांना 26 टक्क्यांचा परतावा दिला. तर 3 महिन्यात हा स्टॉक 107 टक्क्यांनी वधारला. 6 महिन्यात क्युपीड लिमिटेडचा शेअर 236 टक्क्यांनी पळाला. एका वर्षात या स्टॉकने 154 टक्क्यांचा परतावा दिला. गेल्या 52 आठवड्यात या शेअरचा उच्चांकी कामगिरी 222.65 रुपये अशी होती. तर निच्चांक 50 रुपये इतका होता. कंपनीचे मार्केट कॅप 5786.81 कोटी रुपये आहे. गेल्या दोन वर्षात क्युपीड कंपनीचा शेअर 1016 टक्क्यांनी वाढला. तर 3 वर्षांत कंपनीने गुंतवणूकदारांना 1763 टक्क्यांचा रिटर्न दिला. कंपनीने यापूर्वी गुंतवणूकदारांना एका शेअरवर एक शेअर बोनस सुद्धा दिला आहे. हा शेअर लंबी रेस का घोडा ठरतो की नाही याचा अभ्यास तज्ज्ञ करत आहेत. उद्या या शेअरची कामगिरी दिसून येईल.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.
