AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्याकडे असेल हा स्टॉक तर होणार मालामाल; लवकरच महारत्न होणार संरक्षण क्षेत्रातील ही कंपनी

Maharatna Company : HAL कंपनीला या वर्षाअखेर महारत्न दर्जा मिळण्याची दाट शक्यता आहे. आता कंपनीला 5000 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज उरणार नाही. जाणून घ्या काय काय होईल फायदा. तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

तुमच्याकडे असेल हा स्टॉक तर होणार मालामाल; लवकरच महारत्न होणार संरक्षण क्षेत्रातील ही कंपनी
HAL करेल मालामाल
| Updated on: Sep 13, 2024 | 5:58 PM
Share

HAL Share Price : या वर्षी शेअर बाजारात संरक्षण आणि सरकारी शेअर भाव खाऊन गेले. या शेअरची भारतात चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी संसदेत भारतीय गुंतवणूकदारांना या शेअरच्या घौडदौडीची हमी दिली होती. तसेच हे शेअर खरेदी करण्याचा सल्ला पण दिला होता. ज्याने त्यावेळी गुंतवणूक केली. त्यांना त्याचा मोठा फायदा झाला आहे. या क्षेत्रातील अनेक शेअरने मोठी झेप घेतली आहे. आता हिंदुस्थान एरॉनॉटीक्स HAL (Hindustan Aeronautics Ltd) विषयी मोठी बातमी समोर येत आहे. या कंपनीला या वर्षी महारत्न कंपनीचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा फायदा होईल.

ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार, HAL कंपनीला या वर्षाअखेर महारत्न कंपनीचा दर्जा मिळू शकतो. आता कंपनीला ₹5000 कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीसाठी सरकारच्या मंजूरीची गरज उरली नाही. सध्या कंपनीला ₹1000 कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीसाठी मंजूरीची गरज नाही. पण महारत्न कंपनीचा दर्जा मिळाल्यावर कंपनीला 5000 कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीसाठी सरकारच्या मंजूरीची गरज उरणार नाही.

HAL च्या शेअरची कामगिरी

HAL च्या शेअरमध्ये या घडामोडीमुळे जवळपास 1 टक्क्यांची तेजी आली आहे. जर कंपनीला महारत्न कंपनीचा दर्जा मिळाला तर या वर्षात हा शेअर तेजीत येईल. गेल्या एका महिन्यात तरी या शेअरमध्ये मोठा बदल दिसला नाही. पण गेल्या 6 महिन्यात हा शेअर 52% तेजीत आहे. या वर्षी आतापर्यंत हा स्टॉक 64% तेजीत आला आहे. या वर्षभरात हा स्टॉक 133% रिटर्न दिला आहे.

महारत्न दर्जा मिळाल्याने काय होईल

1. कंपनीला त्यांच्या वित्तीय कामकाजाशी संबंधीचा अधिकार मिळतो.

2. ही कंपनी विना सरकारी मंजूरीशिवाय कोणत्याही योजनेत 5,000 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकते.

3. या कंपन्या घरगुती आणि परदेशी कंपन्यांचे अधिग्रहण अथवा विलीनीकरण करु शकते.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

Follow Us
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद...
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद, नेमकं प्रकरण काय?
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी,
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, नेमकं...
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?