आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय मसाल्यांना मोठी मागणी; सात वर्षांमध्ये निर्यात साठ टक्क्यांनी वाढली

| Updated on: Dec 22, 2021 | 8:31 PM

जागतिक बाजारामध्ये भारतीय मसाल्यांची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने निर्यातीमध्ये देखील मोठ्याप्रमाणात वृद्धी झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय मसाल्यांना मोठी मागणी; सात वर्षांमध्ये निर्यात साठ टक्क्यांनी वाढली
Follow us on

नवी दिल्ली: जागतिक बाजारामध्ये भारतीय मसाल्यांची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने निर्यातीमध्ये देखील मोठ्याप्रमाणात वृद्धी झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली. काळे मीरी, अदरक, हळद, जीरे, मोहरी या भारतीय मसाल्यांच्या पदार्थांची विदेशातून मागणी वाढली आहे. निर्यात वाढल्याने मसाला उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाला देखील चांगला दर मिळत आहे. कृषी मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या सात वर्षांमध्ये मसाले उत्पादनाच्या निर्यातीमध्ये तब्बल साठ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

1.07 कोटी टन मसाल्याची निर्यात

कृषी मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, परदेशामध्ये भारतात तयार होणाऱ्या मसाल्यांच्या पदार्थांना मोठी मागणी आहे. मसाल्याची निर्यात अधिकाधिक प्रमाणात व्हावी आणि त्यातून शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी केंद्राकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. मसाल्यांची गुणवत्ता टिकवण्यावर भर देण्यात येत आहे. 2014-15 या वर्षामध्ये भारताने एकूण 67.64 लाख टन मसाल्यांच्या पदार्थांची निर्यात केली होती. तेच प्रमाण वाढून 2020-21 मध्ये 1.07 कोटी टनांवर पोहोचले आहे. मसाल्यांच्या उत्पादनामधून भारताला चालू वर्षामध्ये तब्बल 29,535 कोटी रुपयांची विदेशी गंगजळी प्राप्त झाली आहे. हेच प्रमाण 2014-15 मध्ये 14,899 कोटी रुपये एवढे होते. म्हणजेच विदेशी गंगाजळीमध्ये जवळपास  दुपटीने वाढ झाली आहे.

का वाढली मसाल्याची मागणी 

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी याबाबत बोलताना सांगितले की,  गेल्या दोन वर्षांपासून जगावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनापासून बचावासाठी मसाल्याच्या विविध पदार्थांपासून बनवलेला काढा उपयुक्त  ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मसाल्याच्या पदार्थांना जागतिक स्थरावर मागणी वाढली. तसेच भारतामध्ये तयार होणारे मसाल्याचे पीक हे इतर देशाच्या तुलनेमध्ये उच्चप्रतिचे असते. त्यामुळे भारतीय मसाल्यांना बाजारात मोठी मागणी आहे.

संबंधित बातम्या

पुरुषांपेक्षा महिलांचा क्रेडिट स्कोअर का आहे चांगला; अहवालातून झाला मोठा खुलासा

पेट्रोल, डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत होणार का?, अर्थ राज्यमंत्र्यांची संसदेत महत्त्वपूर्ण माहिती

EPFO Balance Enquiry : ईपीएफओ सदस्य ‘या ‘पद्धतीनं चेक करू शकतात ऑनलाइन बॅलन्स