पुरुषांपेक्षा महिलांचा क्रेडिट स्कोअर का आहे चांगला; अहवालातून झाला मोठा खुलासा

सर्वसाधारण पणे घरातील आर्थिक व्यवहार हे पुरूषच सांभाळतात. मात्र कोरोना आणि वाढत्या महागाईमुळे यामध्ये मोठ्याप्रमाणात बदल झाला आहे. अनेक घरातील आर्थिक व्यवहाराच्या नाड्या या महिलांच्या हातामध्ये गेल्या आहेत.

पुरुषांपेक्षा महिलांचा क्रेडिट स्कोअर का आहे चांगला; अहवालातून झाला मोठा खुलासा
'असा' वाढवा तुमचा क्रेडिट स्कोर
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 22, 2021 | 7:48 PM

मुंबई: सर्वसाधारण पणे घरातील आर्थिक व्यवहार हे पुरूषच सांभाळतात. मात्र कोरोना आणि वाढत्या महागाईमुळे यामध्ये मोठ्याप्रमाणात बदल झाला आहे. अनेक घरातील आर्थिक व्यवहाराच्या नाड्या या महिलांच्या हातामध्ये गेल्या आहेत. पुरुषांच्या तुलनेमध्ये महिला आर्थिक व्यवहार अधिक चांगल्या प्रकारे सांभाळत असल्याचे एका रिपोर्टमधून नुकतेच समोर आले आहे. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या महिलांच्या संख्येमध्ये गेल्या एक वर्षाच्या काळात तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ

देशातील तब्बल बारा टक्के नागरिक हे क्रेडिट कार्डाचा वापर करतात. 2020 मध्ये हीच संख्या 8.41 टक्के इतकी होती. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकामध्ये झालेल्या वाढीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. यामध्ये 18 ते 30 वयोगटातील महिला क्रेडित कार्डाचा सर्वाधिक वापर करत असल्याचे दिसून आले आहे. तुम्हाला जेव्हा एखाद्या बँकेकडून अथवा अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांकडून कर्ज घ्यायचे असते, तेव्हा सर्वप्रथम तुमचा क्रेडित स्कोर पहिला जातो. याच क्रेडित स्कोरच्या आधारे तुम्हाला कर्ज दिले जाते. गेल्या दोन वर्षांमध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांचा क्रेडित स्कोर हा अधिक चांगला असल्याचे समोर आले आहे.

72 टक्के महिलांचा क्रेडिट स्कोर 700  पेक्षा अधिक

या रिपोर्टनुसार पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांचा क्रेडिट स्कोर हा अधिक चांगला आहे. जवळपास 72 टक्के महिलांचा क्रेडिट स्कोर हा 700  पेक्षा अधिक आहे. तर पुरुषांबाबत बोलायचे झाल्यास 66 टक्के पुरुषांचा क्रेडिट स्कोर हा 66 टक्के आहे. कर्ज परफेडीमध्ये देखील महिला आघाडीवर आहेत. जवळपास 50 टक्के महिलांनी घेतलेले कर्ज मुदतीच्या आत फेडले आहे. तर पुरुषांचे हेच प्रमाण 45 टक्के इतके आहे. घेतलेले कर्ज वेळेत परतफेड केल्यामुळे महिलांचा क्रेडीट स्कोर सुधारण्यास मदत झाली आहे. तसेच कर्ज घेण्याच्या बाबतीमध्ये देखील महिलांनी बाजी मारली आहे. गेल्या एक वर्षामध्ये गृह कर्जासह अन्य कर्ज घेणाऱ्या महिलांच्या संख्येमध्ये 20  टक्क्यांनी वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या

BHSeries: वाहनांसाठी भारत सिरीज लागू; नव्या सिरीजसाठी ‘असा’ करा अर्ज

शेअरबाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 611 अंकाच्या वाढीसह बंद; गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

Smart Home Tips | वीज बिलानं खिशाला भुर्दंड; टिप्स वापरा, वीज बिल घटवा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें