Happy New Year 2021 : नव्या वर्षात ‘या’ गोष्टी बदलणार, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय परिणाम पडणार

नव्या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या जीवनावर काय बरे-वाईट परिणाम होणार काय बदल होणार हे समजून घेणे गरजेचे आहे. (upi payments car price)

Happy New Year 2021 : नव्या वर्षात 'या' गोष्टी बदलणार, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय परिणाम पडणार
न्यूझीलंडमध्ये (New Zealand)नवीन वर्षाचं स्वागत (New Year 2021) करण्यात आलं. यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली. इथल्या ऑकलंड शहरात नागरिकांनी नववर्षाच्या स्वागताला (Welcome)गर्दी केली.
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 8:04 AM

मुंबई : नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. नव्या आशा, नव्या स्वप्नांसह या नव्या वर्षात काहीतरी अनोखं करण्याचा संकल्प प्रत्येकानेच केला असेल. मात्र, तंत्रज्ञानाच्या दुनियेत म्हणा किंवा ऑनलाईन व्यवहार, किंवा मोबाईल जगत या क्षेत्रांमध्ये नव्या वर्षात अनेक बदल होणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या जीवनातकाय बदल होणार हे जाणून घेणे गरजेचे आहे. (detailed update of upi payments whatsapp technology and car price in new year)

UPI पेमेन्टवर एक्स्ट्रा चार्ज

या वर्षापासून ऑनालाईन पेमेन्ट करताना आगावीची रक्कम मोजावी लगणार आहे. Amazon Pay, Google Pay आणि Phone Pay सारख्या अ‌ॅपवर पैशांचे व्यवहार करण्यासाठीचे सेवाशुल्क वाढवण्यात आले आहे. नॅशनल पेमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 1 जानेवारीपासून त्रयस्त संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या यूपीआय Payment अ‌ॅपसाठी चार्जेस वाढवण्याचे जाहीर केल होते. त्यानुसार आता यूपीआय पेमेन्टवर व्यवहार करताना घेतले जाणारे सेवाशुल्क वाढवले जाणार आहे.

कारची किंमत वाढणार

या वर्षापासून देशातील सर्व कारची किंमत वाढणार आहे. सर्व ऑटोमोबाईल कंपन्या जानेवारी 2021 पासून कारच्या किमती वाढवणार आहेत. यामध्ये टाटा मोटर्स, मारुती, होंडा, रेनॉ, महिंद्रा, फोर्डसारख्या बड्या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे नागरिकांना कोणतीही कार खरेदी करावयाची असेल तर या वर्षी थोडे जास्त पैसै मोजावे लागतील.

गाड्यांवर FASTAG अनिवार्य

चालू वर्षापासून गाड्यांवर फास्टटॅग लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. PayTM, Amazon, Snapdeal सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन त्याची खरेदी करता येऊ शकते. त्याचबरोबर देशातील 25 बँकांच्या माध्यमातूनही फास्टटॅगची खरेदी केली जाऊ शकते.

काही मोबाईलवर WhatsApp चालणार नाही

1 जनेवारी 2021 पासून iPhone आणि Android ऑपरेटींग सिस्टिम असणाऱ्या काही स्मार्टफोनवर WhatsApp ची सेवा बंद करण्यात येणार आहे. iOS 9 आणि Android 4.0.3 ही ऑपरेटिंग सिस्टिम आणि त्यापेक्षा जुन्या मोबाईल फोनवर यानंतर WhatsApp चालणार नाही. iPhone 4S, iPhone 5, iPhone 5S, iPhone 6 आणि iPhone 6S तसेच एचटीसी डिझायर, मोटोरोला ड्रॉयड रेजर, एलजी ऑप्टिमस ब्लॅक आणि सॅमसंग गॅलेक्सी एस 2 अशा मोबाईल फोनचा यात समावेश असेल.

Google Pay वेब अ‌ॅप बंद होणार

जानेवारी म्हणजेच चालू महिन्यापासून गुगल आपले वेब पेमेन्ट अ‌ॅप्लिकेशन Google Pay बंद करणार आहे. तसेच, इन्स्टंट मनी ट्रान्सफरवरसुद्धा सेवाशुल्क आकारणार आहे.

Jio यूजर्सना फ्री व्हाईस कॉल

नव्या वर्षामध्ये जिओची सेवा घेणाऱ्या ग्राहकांना मोठी भेट मिळाली आहे. ज्यामध्ये जिओ यूजर्सना नव्या वर्षापासून मोफत व्हईस कॉल करता येणार आहेत. कॉलिंगच्या सेवेवर जिओ कंपनीकडून कोणतेही सेवाशुल्क आकारले जाणार नाही.

संबंधित बातम्या :

Happy New Year 2021 | सरत्या वर्षासह फॉरवर्ड मेसजलाही म्हणा ‘गुडबाय’, ‘या’ खास अंदाजात द्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा!

(detailed update of upi payments whatsapp technology and car price in new year)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.