Reliance Campa Cola : थंड बाजार झाला हॉट! 50 वर्षांपूर्वीचा कँम्पा कोलाची चव पुन्हा रेंगाळणार, कोणाचा लागणार कार्यक्रम करेक्ट

| Updated on: Mar 12, 2023 | 9:45 AM

Reliance Campa Cola : शीतपेयाच्या बाजारात रिलायन्सच्या खेळीने अनेकांचा करेक्ट कार्यक्रम लागणार आहे. मुकेश अंबानी यांच्या निर्णयाने शीतपेयाचा बाजारात स्पर्धा वाढणार आहे. त्यामुळे बाजारात गरमी आली आहे. उन्हाळ्यात ग्राहकांनाही पर्याय मिळणार आहे तर रिलायन्स असा धुडगूस घालणार आहे.

Reliance Campa Cola : थंड बाजार झाला हॉट! 50 वर्षांपूर्वीचा कँम्पा कोलाची चव पुन्हा रेंगाळणार, कोणाचा लागणार कार्यक्रम करेक्ट
Follow us on

नवी दिल्ली : ‘द ग्रेट इंडियन टेस्ट’च्या माध्यमातून रिलायन्स समूह (Reliance Group) शीतपेयाच्या बाजारात धुडगूस घालण्यासाठी सज्ज झाला आहे. कोट्यवधींची उलाढाल असलेल्या शीतपेय बाजारात रिलायन्सला त्यांचा दबदबा तयार करायचा आहे. सध्या पेप्सी (Pepsi) आणि कोका कोला (Coca Cola) हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत. रिलायन्सने कँम्पा कोलाच्या एंट्रीने या दिग्गजांचा करेक्ट कार्यक्रम होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. रिलायन्सकडे स्वतःचेच मोठे रिटेल नेटवर्क आहे. मोठ्या शहरांपासून निम शहरांपर्यंत रिटेल स्टोअरची मोठी साखळी आहे. तसेच छोट्या-मोठ्या डिलरपर्यंतचे नेटवर्क आहे. त्याचा मोठा फायदा रिलायन्स होईल. त्यांना मार्केटिंगवर भर द्यावा लागणार आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात शीतपेयाचा बाजार गरम राहणार हे नक्की.

मुकेश अंबानी यांच्या (Mukesh Ambani) रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्टस लिमिटेडने (Reliance Consumer Products Limited) 50 वर्षांपूर्वीच्या कोल्ड ड्रिंक ब्रँड रिलाँच केला आहे. कँम्पा हे नाव जुन्या पिढीच्या ओठांवर आजही आहे आणि त्याची चव ही अनेकांना आठवत असेल . प्युअर ड्रिंक्स समूहाकडून (Pure Drinks Group) रिलायन्सने 22 कोटी रुपयांत हा ब्रँड खरेदी केला आहे. सध्या कँम्पा तीन फ्लेवरमध्ये येत आहे. त्यात कँम्पा कोला, कँम्पा लेमन आणि कँम्पा ऑरेंज यांचा समावेश आहे.

1977 मध्ये आणीबाणी (Emergency) समाप्त झाली. त्यानंतर लोकसभा निवडणुका लागल्या. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वावाखाली जनता पक्षाचे सरकार आले. समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस त्यावेळी उद्योगमंत्री होते. त्यांनी परदेशी कंपन्यांच्या नियंत्रणासाठी परकीय चलन नियमन कायदा दुरुस्ती, 1973 , FERA हा कायदा आणला. या कायद्यानुसार, भारतात व्यवसाय करायचा असेल तर परदेशी कंपन्यांना 60 हिस्सा भारतीय कंपनीत असणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यामुळे परदेशी कंपन्यांनी भारतातून गाशा गुंडाळला. त्यात कोका-कोलानेही पळ काढला.

हे सुद्धा वाचा

Coca Cola चा भारतातील व्यापार मुंबई स्थित प्युअर ड्रिंक्स समूह सांभाळत होता. हा समूहचा भारतातील एकामात्र वितरक होता. त्याच्याकडे बॉटलिंग आणि वितरणाची जबाबदारी होती. जनता सरकारच्या निर्णयाचा मोठा फटका या समूहाला बसला. कोका कोला, सॉफ्ट ड्रिंक बनविण्याचा फॉर्म्युला भारताला द्यायला तयार नव्हता. त्यामुळे या कंपनीने भारताताने कारभार आटोपता घेतला. त्यानंतर प्युअर ड्रिंक्स समूहाने त्यांचा Campa ब्रँड मैदानात उतरवला. त्याचवेळी सरकारने डबल सेवेन (77) हा कोल्ड्रिंक्स ब्रँड बाजारात उतरवला. पण कॅम्पा कोलावर लोकांच्या उड्या पडल्या. तर सरकारच्या कोल्ड्रिंक्स योजना बारगळली.

सलमान खान याने कँम्पा कोलाची पहिली जाहिरात केली होती. पण पुढे भारताने रशियाच्या पाऊलावर पाऊल टाकत, उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाचा नारा दिला. 90 च्या दशकात नरसिंहराव यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी अनेक वित्त सुधारणा केल्या. डंकल करार आणि इतर अनेक गोष्टी घडल्या. त्यात जगातील मोठे ब्रँडस देशात आले. त्यांच्या रणनीतीपुढे कँम्पा तग धरु शकला नाही. 2001 साली कँम्पाने त्यांचे दिल्लीत कार्यालय, बॉटलिंग प्लँट बंद केला.