
दिवाळीत प्रत्येकाला कुठंतरी गुंतवणूक करायची आहे. त्यातून कमाई करायची आहे. शेअर बाजारात काही जण मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान कमाईचे गणित मांडत आहेत. तर काहींना एका वर्षात चांगला परतावा हवा आहे. सेंट्रम ब्रोकिंगने दिवाळीत गुंतवणुकीसाठी 10 शेअर पसंत केले आहेत. ब्रोकरेजच्या दाव्यानुसार हे शेअर गुंतवणूकदारांना पुढील एका वर्षात 18 टक्के ते 31 टक्क्यांपर्यंत रिटर्न देतील. हे शेअर मॅन्युफॅक्चरिंग,बँकिंग, ऑटोमोबाईल सारख्या विविध क्षेत्रातील आहे. अर्थात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. तुम्ही ही त्या स्टॉकविषयी संशोधन करा आणि मग तुमचा निर्णय घ्या.
Dixon Technologies : डिक्सन टेक्नोलॉजीज सेंट्रम ब्रोकिंगच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. व्यापारी वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीत हा स्टॉक 15 टक्क्यांच्या वाढीचे संकेत देत आहे. याची टार्गेट प्राईस 21,574 रुपये आहे. सध्याच्या किंमतीपेक्षा ही किंमत जवळपास 25 टक्के अधिक आहे.
Cholamandalam Investments : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी(CIFC) 2026 च्या दुसऱ्या तिमाहीत पुढे येण्याची शक्यता आहे. ब्रोक्रिंग फर्मनुसार ही कंपनी 20 टक्के CAGR आणि NIM 15 बेसिस पॉईंटपर्यंत वाढवण्यात यशस्वी राहील.
Azad Engineering : सेंट्रम ब्रोकिंगने हा शेअर 2,145 रुपयांच्या टार्गेट प्राईसवर ठेवला आहे. कंपनीला 6000 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीचा EBITDA आणि PAT मजबूत आहे. या कंपनीची टार्गेट प्राईस सध्याच्या किंमतीपेक्षा जवळपास 25 टक्के अधिक असू शकतो.
Canara Bank : कॅनेरा बँक एनपीएचा सामना करत आहे. पण ही बँक येत्या काही वर्षात ही अडचण सोडवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बँकेच्या शेअरची टार्गेट प्राईस 151 रुपये इतकी आहे.
Syrma SGS Technology : या कंपनीच्या ऑपरेशनल महसूलात दोन वर्षांत 30 टक्के CAGR वाढ होऊ शकते. कंपनी पुढील आर्थिक वर्षात चांगली प्रगती करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शेअरवर ब्रोकिंग फर्म फिदा आहे.
याशिवाय या यादीत Nykaa, Swiggy, KEI Industries, Bajaj Auto आणि Bharat Electronics सारख्या कंपन्यांचे शेअर पण आहेत.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.