AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: अगोदर करा ईपीएफओचे काम, उद्या इतक्या तास पीएफ सेवा बंद

EPFO PF Update: पीएफ खातेदारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यांना ईपीएफओ संबंधित काही महत्त्वाची कामे असतील तर अगोदरच पूर्ण करावी लागणार आहे. उद्या 5 ऑगस्ट रोजी ईपीएफओची सेवा काही तासांकरीता बंद असेल. नवीन बदलांचा कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे.

EPFO: अगोदर करा ईपीएफओचे काम, उद्या इतक्या तास पीएफ सेवा बंद
ईपीएफओ
| Updated on: Aug 04, 2026 | 4:10 PM
Share

पीएफ खात्यासंबंधीत महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा विचारात असाल तर तुम्हाला उद्यासाठी थांबावे लागू शकते. ईपीएफओने त्यांच्या कोट्यवधी सदस्यांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे. सब्सक्राईबर्ससाठी त्यांनी अलर्ट जाहीर केला आहे. त्यानुसार, उद्या 5 ऑगस्ट 2026 रोजी ई-ऑफिस ॲप्लीकेशन (e-Office application) सेवा काही काळ बंद असेल. याचा अर्थ या कालावधीत युझर्स, कर्मचारी कोणत्याही सेवेचा लाभ घेऊ शकणार नाही. डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करू शकणार नाहीत. काय आहेत याविषयीची अपडेट?

ई-ऑफिस ॲप यावेळेत पूर्ण बंद

ईपीएफओने 3 ऑगस्ट 2026 रोजी याविषयीची अधिकृत माहिती दिली आहे. बुधवारी, 5 ऑगस्ट 2026 रोजी ई-ऑफिस सेवा पूर्णपणे ठप्प होतील. संध्याकाळी 6:00 वाजेपासून ते 9:30 वाजेपर्यंत सर्व सेवा बंद असतील. या साडेतीन तासात युझर्स ई-ऑफिस ॲपचा वापर करू शकणार नाहीत. ईपीएफओविषयी एखादा अर्जफाटा करायचा असेल तर अगोदर करा अथवा नाहक त्रागा करून घेण्यापेक्षा नंतर हे काम करा.

सिस्टिम अपग्रेडशी संबंधित तांत्रिक कारण

अचानक ही सेवा बंद का करण्यात येत आहे याविषयीचा प्रश्न कर्मचाऱ्यांमध्ये आहे. ईपीएफओने त्यांची डिजिटल सेवा अत्याधुनिक करण्यासाठी अजून एक मोठे पाऊल टाकले आहे. त्यासाठीच हा तीन ते साडेतीन तासांच्या कालावधीत सर्व कामे बंद असतील. या कालावधीत सिस्टिम अपग्रेडेशन करण्यात येईल. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरची (NIC) ई-ऑफिस टीम या कालावधीत या प्लॅटफॉर्मवरील अनेक सेवा अपडेट करणार आहे. या प्रक्रियेत ई-फाईल, पोर्टल, एमआईएस (MIS) आणि एमडीएम (MDM) नवीन व्हर्जन इन्स्टॉल करण्यात येतील. या सुधारणेनंतर ही सेवा अधिक सुरक्षित, गतिमान होईल.

पीएफ क्लेम मंजूरीसाठी लागू शकतो वेळ

जूनच्या अखेरीस ईपीएफओने कर्मचारी पोर्टल आणि उमंग ॲपमध्ये डेटाबेस हलवला होता. ईपीएफओने आता महत्त्वाचे सॉफ्टवेअर अपग्रेडचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. नवीन व्यवस्थेत ते हळूहळू लाईव्ह करण्यात येत आहे. ईपीएफओने स्पष्ट केले आहे की सिस्टिम मायग्रेशननंतर क्लेम आणि सर्व्हिस रिक्वेस्टसाठी थोडा वेळ लागू शकतो. कोणतीही चूक होऊ नये यासाठी वेळ लागणार आहे. या काळात पोर्टलवर वारंवार लॉगिन करू नका असे आवाहन ईपीएफओने केले आहे. त्याचवेळी उमंग ॲपमध्ये काही अर्ज करू शकता, पण येथेही सदस्यांना सेवांसाठी काही काळ वाट पहावी लागू शकते.

Follow Us
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना
तर तुम्हाला गुंगी गुडिया म्हणणे योग्यच आहे!; सपकाळांचा सुनेत्रा...
Harshwardhan Sapkal | तर तुम्हाला गुंगी गुडिया म्हणणे योग्यच आहे!; सपकाळांचा सुनेत्रा पवारांवर पुन्हा हल्लाबोल
ओमराजे, सचिन अहिर थेट लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला; इतर खासदार...
ओमराजे, सचिन अहिर थेट लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला; इतर खासदार... दिल्लीत खरंच काही तरी घडतंय?
भाजपने घाबरण्याची गरज नाही, ED-CBI तुमचीच!; अभिजीत दिपकेंचा थेट टोला
Abhijeet Dipke | भाजपने घाबरण्याची गरज नाही, ED-CBI तुमचीच!; अभिजीत दिपके यांचा थेट टोला
मोठी बातमी! 6 महिन्यांच्या आतच... माणिकराव कोकाटेंच्या संदनिका वाटप...
मोठी बातमी! 6 महिन्यांच्या आतच... माणिकराव कोकाटेंच्या 1995 मधील सदनिका वाटप प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात काय घडलं?
गुंगी गुडियावरून राजकारण पेटलं!; मुंडेंनी काँग्रेसला दिलं सडेतोड उत्तर
Dhananjay Munde | गुंगी गुडियावरून राजकारण पेटलं!; धनंजय मुंडेंनी काँग्रेसला दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले...
धारशिवमध्ये तुफान राडा; जोरदार हाणामारी, गाड्या फोडल्या, दोन पक्ष...
Dharashiv | धारशिवमध्ये तुफान राडा; जोरदार हाणामारी, गाड्या फोडल्या, बड्या नेत्याचे समर्थक थेट... Video व्हायरल
धनुष्यबाणावर संकट? सुनावणीपूर्वी शिंदेंची मंत्र्यांसोबत बैठक
Shivsena | धनुष्यबाणावर संकट की दिलासा? सुनावणीपूर्वी शिंदेंची मंत्र्यांसोबत बंद दाराआड बैठक
सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडिया टीकेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
Rohit Pawar | सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडिया टीकेवर रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया! इंदिरा गांधींचं उदाहरण देत काय म्हणाले?
गुंगी गुडिया? ही काय भाषा? सुनेत्रा पवरांवरील काँग्रेसच्या टीकेवर...
गुंगी गुडिया? ही काय भाषा? सुनेत्रा पवरांवरील काँग्रेसच्या टीकेवर अंजली दमानियांचा संताप, आता थेट...