कोकण किनारपट्टीवर वादळ, मासेमारी ठप्प

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मनोज लेले, टीव्ही 9 मराठी, रत्नागीरी : वातावरण बदलाचा मोठा फटका मासेमाऱ्यांना बसतो आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आज कोकणातल्या मासेमारीला ब्रेक लागला आहे. वातावरणातल्या या बदलामुळे कोकणातली मासेमारी ठप्प झाली. सुरक्षेसाठी बोटी सध्या विविध बंदरात उभ्या आहेत. मिरकरवाडा, हर्णे, साखरीनाटे, जयगड बंदरात मासेमारी करणाऱ्या शेकडो बोटी आश्रयासाठी आल्या. समुद्रातील पाण्याचा प्रवाह […]

कोकण किनारपट्टीवर वादळ, मासेमारी ठप्प
Follow us on

मनोज लेले, टीव्ही 9 मराठी, रत्नागीरी : वातावरण बदलाचा मोठा फटका मासेमाऱ्यांना बसतो आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आज कोकणातल्या मासेमारीला ब्रेक लागला आहे. वातावरणातल्या या बदलामुळे कोकणातली मासेमारी ठप्प झाली. सुरक्षेसाठी बोटी सध्या विविध बंदरात उभ्या आहेत. मिरकरवाडा, हर्णे, साखरीनाटे, जयगड बंदरात मासेमारी करणाऱ्या शेकडो बोटी आश्रयासाठी आल्या. समुद्रातील पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळे मासेमारीची संख्या कमी झाली आहे.

अरबी समुद्रात गेल्या आठवड्याभरापासून अनेक प्रकारचे मासे मिळत नाही आहेत. त्यामुळे मासेमार हवालदील झाला आहे. पुढील आणखी दोन दिवस अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा राहणार आहे. त्यामुळे मासेमारांनी खोल समुद्रात जाऊ नये अशा सूचना मत्स्यविभागाने दिल्या आहेत. समुद्रातील पाण्याला करंट असल्यामुळे आणि वादळी परिस्थितीमुळे शेकडो बोटी विविध बंदरात विसावल्या आहेत.

कोकण परीसरात राहणारे लोक हे पूर्णपणे मासेमारीवर अवलंबून आसतात. मासेमारी हेच त्यांच्या उपजीविकेचं साधन आहे. समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणातली मासेमारी ठप्प झाली आहे.  त्याचा विपरीत परिणाम मासेमारी उद्योगावर होऊ शकतो.