
आपल्याला या कौटुंबिक व्यावसायात येण्यासाठी उत्ताधिकारी म्हणून फारसा दबाव नव्हता, परंतू एक जिज्ञासा आणि एक शांतपणे घेतलेला हा माझा निर्णय होता असे नल्ली ग्रुपच्या व्हाईस चेअरमन लावण्या नल्ली यांनी टीव्ही ९ नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्यासोबत ‘ड्युओलॉग एनएक्सटी’या सिग्नेचर थॉट-लीडरशिप सीरीजमध्ये मारलेल्या मनमोकळ्या गप्पात सांगितले. टीव्ही ९ नेटवर्कची ही मुलाखत मालिका पारंपारिक यशोगाथांच्या पलीकडे जाते आणि भारताची बदलती ओळख घडवणाऱ्या विचारवंतांच्या दृष्टिकोनांचा शोध घेत असते.
Duologue मध्ये सहभागी होण्याबद्दलच्या अनुभवाबद्दल लावण्या म्हणाल्या, “या संवादातून मला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत झाली. आणि ‘नल्ली’सारख्या ब्रँडसाठी मला मिळालेल्या या व्यासपीठाबद्दल मी आभारी आहे. कौटुंबिक व्यवसायात परत येणं माझ्यासाठी गर्वाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. आणि टीव्ही 9 नेटवर्कचे त्यासाठी मी आभार मानते की त्यांनी मला या भावना व्यक्त करण्याची संधी दिली.”
“जेव्हा मी 21 वर्षांची होते तेव्हा नल्ली ग्रुपमध्ये सामील झाले, तेव्हा मला अर्थशास्त्र, रिटेल किंवा व्यवसाय याबद्दल काहीही कल्पना नव्हती. सहनशीलता हेच माझ्यासाठी प्रशिक्षणाचं मैदान होतं. मला चुका करण्याची मुभा देण्यात आली, आणि तेच स्वातंत्र्य ही माझी खरी शिक्षक ठरली.”
लावण्याने स्पष्ट केलं की डेटा-आधारित रणनीती आणि कालातीत हस्तकलेच्या कौशल्याचा संगम करून तिने नल्लीच्या भविष्यासाठी एक नवी दिशा ठरवली.ई-कॉमर्स क्षेत्रात पुढाकार घेण्याचा तिचा निर्णय आत्मविश्वासावर आधारित होता.
त्या पुढे म्हणाल्या की , ‘2013 साली जेव्हा आपण ई-कॉमर्सकडे पाहिलं, तेव्हा अनेक पारंपरिक विक्रेत्यांनी त्याकडे एक डिस्काउंट ट्रिक म्हणून पाहिलं. मात्र, नंतर ग्राहकांच्या वर्तनामध्ये मोठा बदल दिसला. तुम्ही ऑनलाइन खरेदी करा किंवा दुकानात – विश्वास आणि गुणवत्ता हाच निर्णयाचा पाया ठरतो. एखादी सेवा तेव्हाच जिंकेल, जेव्हा ब्रँड ग्राहकांचा विश्वास मिळवेल.”
हा संवाद एका घराघरातील नावाला आधुनिक आणि जागतिक ब्रँडमध्ये रूपांतरित करण्याच्या कलेपर्यंत पोहोचतो.
लावण्या याचं म्हणणं आहे की,टआमच्यासाठी कधीच फक्त नफा महत्त्वाचा नव्हता – प्रामाणिकपणा हेच आमचं मूल्य होतं. जसं योग किंवा आयुर्वेदाकडे एक आकर्षण असतं, तसंच साडीच्या परंपरेतही एक विशिष्ट तेज आहे.”
लावण्या यांच्या मते सर्वात मोठा प्रश्न म्हणजे –“आपण ही परंपरा जगासमोर नव्या स्वरूपात कशी सादर करणार?”
त्यांना विचारण्यात आलं की, एक पुरुषप्रधान कौटुंबिक व्यवसायात आपलं स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला का?
त्यावर त्या म्हणाल्या की, “मला कधीच असं वाटलं नाही की आपण एखादी लढाई लढत आहोत. आपण फक्त मला योग्य वाटेल ते केलं, आणि जर कोणाला त्यातून अडचण वाटत असेल, तर ती त्यांची समस्या आहे, माझी नाही.”
लावण्य नल्ली यांचा Duologue NXT चा एपिसोड
📅 06 ऑक्टोबर 2025
🕥 रात्री 10:30 वाजता
📺 News9 वर प्रसारित होणार आहे.
याशिवाय, हा एपिसोड तुम्ही
🔴 Duologue YouTube चॅनेल (@Duologuewithbarundas)
📱 आणि News9 Plus अॅपवरही स्ट्रीम करू शकता.