
Earn Money Without Skills : अनेकांना नोकरी करायची नसते. तर काहींकडे फारसं शिक्षण नसतं. त्याच्यांकडं काही कौशल्यही नसतं. अशा लोकांनाही या आयडियाच्या माध्यमातून स्वतः कमाई करता येऊ शकते. या जॉबसाठी फार स्किल अथवा तांत्रिक ज्ञानाची गरज नाही. यासाठी मोबाईल, लॅपटॉप आणि काही सामान्य गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे.
सरकारी अर्ज भरुन द्या
ग्रामीण भागातच नाही तर शहरातही अनेकांना PAN, Aadhar, Ration Card काढण्यासाठी कसा अर्ज करावा हे माहिती नसते. अथवा काही चुक होऊ नये यासाठी ते सीएससी सेंटरवर जातात. अनेक विद्यार्थी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी अशा केंद्रांवर जातात. ही तुमच्यासाठी संधी आहे. या माध्यमातून तुम्हाला चांगली कमाई करता येते. यासाठी लॅपटॉप,मोबाईल आणि इंटरनेटची गरज आहे. एक अर्ज भरण्यासाठी 50 ते 100 रुपयांची कमाई आरामशीर होते.
WhatsApp वर ऑर्डर घ्या
स्थानिक डिलिव्हरी करणाऱ्याशी टायअपकरून दुध,भाजीपाला,घरातील किराणा, फूड्स घरपोच पोहचवू शकता. त्यासाठी WhatsApp वर ऑर्डर घेता येईल. प्रत्येक ऑर्डरमागे तुम्ही 10 ते 50 रुपये कमाई करू शकता. यामध्ये कोणतीही गुंतवणूक नाही की त्यासाठी कौशल्याची गरज आहे. पण तुम्हाला ग्राहक सांभाळून ठेवण्यासाठी वेळ पाळावी लागेल.
ट्रेडिंग बातमीतून कमाई
आजकाल लोकांना इन्स्टट हवं असते. तुम्ही ताज्या ट्रेडिंग बातम्या तयार करून त्या YouTube शॉर्ट्सच्या माध्यमातून शेअर करू शकता. 30 सेकंदाची बातमी कॅनव्हावर संपादित करून एआय व्हॉईसचा वापर करून तयार करता येईल. प्रत्येक दिवशी साधारण पाच बातम्या शेअर केल्या तर काही महिन्यात तुम्हाला प्रतिसाद मिळेल आणि कमाई सुरू होईल.
रिसेलिंगचा जबरदस्त पर्याय
Amazon अथवा फ्लिपकार्ट यासारख्या साईटवर तुम्ही रिसेलिंग करुन पैसे कमावू शकता. या आधारे लोकांना तुम्ही खरेदीसाठी मदत करू शकता. त्यांना प्रोत्साहन देऊ शकता. चांगल्या वस्तू कोणत्या याचा अभिप्राय देऊन रिसेलिंग करू शकता. त्यातून कमाई होईल.
गुगल ओपिनियन रिवॉर्ड्स
गुगल ओपिनियन रिवॉर्ड्सला साईन अप करा. त्यातील काही प्रश्नांची उत्तरं द्या. त्याआधारे तुम्हाला पैसे कमावण्याचा चांगली संधी मिळू शकते. प्रत्येक सर्वेवर युझर्सला 5 ते 50 रुपयांपर्यंत चांगली कमाई होते. तर काही साईटवर कॅप्चा कोड भरूनही पैसे कमावता येतात. इतरही अनेक साईट्सर छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं देऊन कमाई करता येते. पण हे करण्यापूर्वी त्या साईटची सर्व माहिती घ्या. फसवणुकीपासून दूर राहा.