कर्मचाऱ्यांनो! घरी बसून नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करा, स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया काय?

| Updated on: Nov 22, 2021 | 4:15 PM

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) मध्ये नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तारीख अपडेट केली नाही तर तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे काढण्यात आणि ट्रान्सफर करण्यात अडचणी येऊ शकतात. पण आता ही प्रक्रिया खूप सोपी झालीय, काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरबसल्या नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करू शकता.

कर्मचाऱ्यांनो! घरी बसून नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करा, स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया काय?
पीएफ अकाऊंट
Follow us on

नवी दिल्लीः EPFO: सरकारी आणि गैर सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांकडे निश्चितपणे पीएफ खाती आहेत. यामध्ये पगारदार कर्मचाऱ्यांच्या पगाराचा काही भाग त्यांच्या पीएम खात्यात जमा होतो. अशा परिस्थितीत त्या संस्थेतून नोकरी सोडल्यानंतर किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन नवीन नोकरी सुरू केल्यानंतर आता तुम्ही घरी बसूनही नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करू शकता.  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) मध्ये नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तारीख अपडेट केली नाही तर तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे काढण्यात आणि ट्रान्सफर करण्यात अडचणी येऊ शकतात. पण आता ही प्रक्रिया खूप सोपी झालीय, काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरबसल्या नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करू शकता.

आता घरबसल्या नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करा

टप्पा 1: यासाठी प्रथम तुम्हाला युनिफाइड मेंबर पोर्टलला भेट द्यावी लागेल आणि तेथे जाऊन https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर क्लिक करा. पुढे तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाका
टप्पा 2: यानंतर तुम्हाला मॅनेज ऑप्शनवर जावे लागेल आणि मार्क एक्झिटवर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर ड्रॉप डाऊन मेनूमधील निवडक रोजगारातून पीएफ खाते क्रमांक निवडा. या प्रक्रियेनंतर आता तुम्हाला बाहेर पडण्याची तारीख आणि बाहेर पडण्याचे कारण भरावे लागेल.
टप्पा 3: तुम्ही बाहेर पडण्याचे कारण टाकताच तुम्हाला रिक्वेस्ट ओटीपीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या आधार नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, तो तेथे भरा.
टप्पा 4: ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर चेक बॉक्स पर्याय निवडा आणि नंतर अपडेट पर्यायावर जा. हे करताच तुम्हाला OK चा पर्याय निवडावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमची बाहेर पडण्याची तारीख तेथे अपडेट केली जाईल.

तुम्हाला एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड अर्थात ईपीएफओ खात्यात नाव किंवा जन्मतारीख यांसारखे दुसरे काही अपडेट करायचे असल्यास तुम्ही ते घरी बसून ऑनलाईन सहज करू शकता. अनेकदा आपल्याकडून घाईघाईने काही चुकीची माहिती भरली जाते, अशा परिस्थितीत EPFO ​​तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देते की तुम्ही ही चूक घरी बसून सुधारू शकता, यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.

संबंधित बातम्या

पेटीएमचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी घसरले, काय आहे कारण?

शेअर बाजार कोसळला; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 5.4 लाख कोटींचा फटका