AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर बाजार कोसळला; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 5.4 लाख कोटींचा फटका

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअरबाजार 650 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे गुंंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून, आतापर्यंत तब्बल 5.4 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

शेअर बाजार कोसळला; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 5.4 लाख कोटींचा फटका
शेअर बाजार
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 11:25 AM
Share

मुंबई –  आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअरबाजार 650 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे गुंंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून, आतापर्यंत तब्बल 5.4 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. सोमवारी शेअरबाजार सुरू होताच सेंसेक्स 650 अंकांनी खाली आल्याचे पहायाला मिळाले. सध्या स्थितीमध्ये 633 अंकाच्या घसरणीसह  सेंसेक्स 59,002.62  अंकांवर स्थिरावला आहे. तर दुसरीकडे निफ्टी देखील 155 अंकांनी घसरून 17610 वर पोहोचली आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी देखील जागतिक स्तरावर शेअर मार्केटमध्ये मंदीचे वातावर होते. जगातील सर्व प्रमुख शेअर मार्केट  हे घसरणीसह बंद झाले. त्याचा फटका आज सोमवारी देखील बसल्याचे पहायला मिळत आहे.

केवळ चार कंपन्यांचे शेअर तेजीत 

गेल्या आठवड्यात शुक्रवारी शेअरबाजामध्ये केवळ 4 कंपन्यांच्या शेअर्समध्येच तेजी दिसून आली तर तब्बल 26 शेअर हे धोक्याच्या पातळीवर कारभार करत होते. भारती एअरटेल, एशियन पेंट्स, पावरग्रिड आणि टीसीएस या चार कंपन्यांच्याच शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर उर्वरीत 26 शेअर्सला मंदीचा फटका बसला. रिलायंस इंडस्ट्रीज, टायटन, मारूती, एसबीआय, एचडीएफसी बँक यांच्या  शेअरची किंमत मोठ्या प्रमाणात घसरली.

गुंतवणूकदारांचे नुकसान 

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केट 650 अंकांनी कोसळल्याने गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे. गुंतवणूकदाराचे 5.40 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीएसई लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप शुक्रवारी 2,69,20,196.99 कोटी रुपये इतकी होती. सोमवारी शेअर मार्केट गडगडल्याने त्यामध्ये घट होऊन ती 2,63,78,463.38  कोटी रुपयांवर  पोहोचली आहे.

भारती एअरटेल टॉपवर 

आपल्या सर्व प्रिपेड प्लॅनचे दर वाढवण्याचा निर्णय भारती एअरटेलने घेतला आहे. येत्या 26 तारखेपासून एअरटेलचे सर्व प्लॅन हे 20 ते 25 टक्क्यांनी महागणार आहेत. याबाबत रविवारी कंपनीच्या वतीने निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा कंपनीला होताना दिसून येत असून, कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आली आहे. सध्या स्थितीमध्ये भारती एअरटेलच्या शेअरची किंमत प्रति शेअर 756 इतकी झाली आहे.

संबंधित बातम्या 

कच्च्या तेलाच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; जाणून घ्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीवर काय होणार परिणाम?

भारती एअरटेलचा ग्राहकांना झटका; प्रिपेड प्लॅनचे दर वाढवले, महिन्याला मोजावी लागणार ‘इतकी’ किंमत

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.