भारती एअरटेलचा ग्राहकांना झटका; प्रिपेड प्लॅनचे दर वाढवले, महिन्याला मोजावी लागणार ‘इतकी’ किंमत

दुरसंचार कंपनी असलेल्या भारती एअरटेलच्या प्रिपेड ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशाती दुसरी सर्वात मोठी कंपनी असलेल्या भारती एअरटेलने आपल्या विविध प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारती एअरटेलचा ग्राहकांना झटका; प्रिपेड प्लॅनचे दर वाढवले, महिन्याला मोजावी लागणार 'इतकी' किंमत
एअरटेल
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 10:24 AM

मुंबई –  दुरसंचार कंपनी असलेल्या भारती एअरटेलच्या (Bharti Airtel)  प्रिपेड ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशाती दुसरी सर्वात मोठी कंपनी असलेल्या भारती एअरटेलने आपल्या विविध प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 26 नोव्हेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत. नव्या दरानुसार जवळपास सर्वच प्लॅनमध्ये 25 टक्क्यांची वाढ होणार आहे. याचा मोठा फटका ग्राहकांना बसू शकतो.

प्रति ग्राहक 300 रुपये मिळकतीचे उद्दिष्ट

याबाबत बोलताना कंपनीने म्हटले आहे की, प्रति ग्राहकामागे सरासरी 200 रुपये प्राप्तीचे उद्दिष्ठ  सुरुवातीला कंपनीकडून ठेवण्यात आले होते. मात्र आता त्यामध्ये बदल करून ते 300 रुपये एवढे करण्यात  आले आहे. त्यामुळे आता प्रिपेड प्लॅनच्या किमती वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. प्लॅनच्या किमतीमध्ये 25 टक्के वाढ होणार असून, येत्या 26 नोव्हेंबरपासून नवे दर लागू केले जातील. मिळालेल्या पैशांमधून आम्हला आमच्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारची सेवा देण्यास मदत होणार असल्याचेही कंपनी म्हटले आहे.

अनलिमिटेड प्लॅनच्या दरांमध्ये वाढ

कंपनीने सर्वच अनलिमिटेड प्लॅनच्या दरांमध्ये वाढ केली आहे. अनलिमिटेड प्लॅनचे दर 20 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. तर 28 दिवसांची मुदत असलेल्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये वाढ करून तो आता 99 रुपये करण्यात आला आहे. तसेच 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये वाढ करून तो 179 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच 219 रुपयांच्या प्लॅनसाठी आता 265  रुपये मोजावे लागणार आहेत. कंपनीने केल्या या अचानक दरवाढीमुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ बसण्याची शक्याता आहे.

संबंधित बातम्या 

निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी ‘एनपीएस’ ठरते वरदान; जाणून घ्या काय आहे योजना, कशी कराल गुंतवणूक?

ई-श्रम पोर्टलवर 8.43 कोटी कामगारांनी केली नोंदणी; जाणून घ्या काय आहेत फायदे?

Amazon BFCM Sale: Amazon चा BFCM सेल 25 नोव्हेंबरपासून सुरू, 70 हजार निर्यातदारांचा सहभाग

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.