AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेटीएमचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी घसरले, काय आहे कारण?

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, शेअरच्या मूल्यांकनाबाबत चिंता आहे. अँट ग्रुपचा 18,300 कोटी रुपयांचा IPO या महिन्याच्या सुरुवातीला 1.89 पट ओव्हर-सबस्क्राइब झाला. त्याचा आयपीओ कोल इंडियाच्या 15,000 कोटी रुपयांच्या IPO पेक्षा मोठा आहे, जो एका दशकापूर्वी आणला होता. कंपनीची सुरुवात 2000 साली झाली. One97 Communications ही भारतातील ग्राहक आणि विक्रेत्यांसाठी सर्वात मोठी डिजिटल इकोसिस्टम आहे.

पेटीएमचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी घसरले, काय आहे कारण?
ऑनलाइन पेमेंट प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 3:24 PM
Share

नवी दिल्लीः Paytm Shares: Paytm ची मूळ कंपनी आणि अलीकडे सूचीबद्ध One97 Communications मध्ये सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. 22 नोव्हेंबरला कंपनीचा शेअर सुमारे 14 टक्क्यांनी घसरला. BSE वर शेअर 13.66 टक्क्यांनी घसरून 1,350.35 रुपयांवर आला. NSE वर पेमेंट्स कंपनीचा स्टॉक 13.39 टक्क्यांनी घसरून 1,351.75 रुपयांवर आला. One97 Communications Ltd च्या समभागांनी बाजारात कमकुवत पदार्पण केले आणि 2,150 रुपयांच्या इश्यू किमतीपासून 27 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

तज्ज्ञ काय म्हणतात?

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, शेअरच्या मूल्यांकनाबाबत चिंता आहे. अँट ग्रुपचा 18,300 कोटी रुपयांचा IPO या महिन्याच्या सुरुवातीला 1.89 पट ओव्हर-सबस्क्राइब झाला. त्याचा आयपीओ कोल इंडियाच्या 15,000 कोटी रुपयांच्या IPO पेक्षा मोठा आहे, जो एका दशकापूर्वी आणला होता. कंपनीची सुरुवात 2000 साली झाली. One97 Communications ही भारतातील ग्राहक आणि विक्रेत्यांसाठी सर्वात मोठी डिजिटल इकोसिस्टम आहे.

दिवाळीच्या सुट्टीपूर्वीच्या महत्त्वाच्या कालावधीचा समावेश

पेटीएमने नुकतेच ऑक्टोबरचे आर्थिक तपशील जारी केले. यामध्ये दिवाळीच्या सुट्टीपूर्वीच्या महत्त्वाच्या कालावधीचा समावेश आहे. कंपनीने सांगितले की, महिन्यातील तिचे एकूण व्यापारी मूल्य 131 टक्क्यांनी वाढून 832 अब्ज रुपये झाले. पेटीएमच्या नफा मिळविण्यासाठी विश्लेषकांनी महत्त्वपूर्ण मानलेल्या कर्जाचे वितरण 400 टक्क्यांहून अधिक वाढून 6.27 अब्ज रुपयांवर पोहोचले. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, शेअरच्या किमतीत फारशी वाढ होणार नाही, कारण 87 टक्के इश्यू संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सबस्क्राइब केलाय, जे नेहमी किमतीला समर्थन देऊ शकतात.

मोठ्या तंत्रज्ञान कंपनीचे हे आतापर्यंतचे सर्वात वाईट पदार्पण

भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट कंपनीने व्यापाराच्या पहिल्याच दिवसात तिचे मूल्य एक तृतीयांशपेक्षा जास्त गमावले. एका मोठ्या तंत्रज्ञान कंपनीचे हे आतापर्यंतचे सर्वात वाईट पदार्पण आहे. देशाच्या जागतिक भांडवलाच्या वाढत्या आकर्षणाचे प्रतीक म्हणून काही गुंतवणूकदार आयपीओकडे पाहत आहेत. विशेषत: त्या गुंतवणूकदारांसाठी जे चीनला पर्याय शोधत आहेत.

संबंधित बातम्या

शेअर बाजार कोसळला; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 5.4 लाख कोटींचा फटका

कच्च्या तेलाच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; जाणून घ्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीवर काय होणार परिणाम?

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.