PF धारकांसाठी मोठी अपडेट! TDS मधून सूट मिळवण्यासाठी आता भरावा लागणार Form 121
आर्थिक वर्ष 2026-27 पासून TDS मधून सूट मिळवण्यासाठी FORM 15G आणि FORM 15H ऐवजी FORM 121 वापरण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या सवलतीसाठी करदात्याने पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

पीएफमधून पैसे काढताना TDS कापला जाऊ नये, यासाठी आतापर्यंत FORM 15G आणि FORM 15H चा वापर केला जात होता. मात्र आता या फॉर्ममध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र आता या फॉर्ममध्ये बदल करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2026 – 2027 पासून TDSमधून सूट मिळवण्यासाठी FORM 15G आणि FORM 15H ऐवजी FORM 121 वापरावा लागणार आहे. नवीन आयकर विभागा अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. नवीन आयकर कायदा 2025 अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. EPFO ने याबाबत एक्सवर पोस्ट करत अधिकृत माहिती शेअर दिली आहे.
FORM 121 म्हणजे काय
FORM 121 हा एक स्व-घोषणा फॉर्म आहे. या फॉर्मव्दारे करदाता संबंधित कर वर्षातील त्याच्या अंदाजित उत्पन्नावर करदेयता शून्य असल्याचे घोषित करतो. आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना या फॉर्मच्या मदतीने TDS न कापण्याची विनंती करता येते.
यापूर्वी TDSमधून सूट मिळवण्यासाठी FORM 15G आणि FORM 15H वापरले जात होते. आता या दोन्ही फॉर्मऐवजी एकच FORM 121 वापरला जाणार आहे. हा बदल केवळ पीएफपुरता मर्यादित नसून,ठरवलेल्या अटींनुसार बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील ठेवींवरील व्याजासह काही अन्य उपन्नावरील TDS साठीही लागू होऊ शकतो.
5 वर्षांपूर्वी पीएफ काढल्यास काय होईल?
नियमांनुसार, सलग पाच वर्षांची सेवा पुर्ण होण्यापूर्वी पीएफमधून पैसे काढल्यास काही परिस्थिंतींमध्ये TDS लागू होऊ शकतो.काढली जाणारी रक्कम 50 हजार रूपयांपेक्षा जास्त असल्यास आणि संबंधित अटी लागू होत असल्यास,पॅनची माहिती दिलेल्या प्रकरणात 10 टक्के TDS कापला जाऊ शकतो.
त्यामुळे पीएफमधून पैसे काढण्यापूर्वी नोकरीचा सलग कालावधी, काढण्यात येणारी रक्कम आणि संबंधित कर वर्षातील अंदाजित उत्पन्न तपासणे आवश्यक आहे. या बाबींवर TDS लागू होतो की नाही आणि सूट मिळू शकते की नाही ,हे अवलंबून असते.
FORM 121 ऑनलाईन भरता येणार?
FORM 121 ऑनलाईन सध्या भरता येत नसला तरी याची सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ही सुविधा सुरू केल्यानंतर कर्मचाऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरणे सोपे जाणार आहे. मात्र केवळ FORM 121 भरल्याने TDS मधून सूट मिळेलच असे नाही. त्यासाठी आवश्यक पात्रता आणि नियम पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे पीएफ काढण्यापूर्वी संबंधित नियम तपासणे महत्त्वाचे आहे.
