EPFO: पाचही बोटं तुपात! पेन्शन 1 वरून 3 हजार? ATM मधून PF काढा, कोट्यवधी कर्मचाऱ्यांसह निवृत्तीधारकांना जॅकपॉट

EPFO Pension PF Withdrawal: EPFO ने कर्मचाऱ्यांना एका पाठोपाठ एक गिफ्ट दिले आहे. आता किमान निवृत्तीवेतन 1000 हून वाढून 3000 रुपये होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर EPFO 3.0 अंतर्गत आता ATM आणि UPI मधून पैसे काढता येतील. काय आहे महत्त्वाची अपडेट?

EPFO: पाचही बोटं तुपात! पेन्शन 1 वरून 3 हजार? ATM मधून PF काढा, कोट्यवधी कर्मचाऱ्यांसह निवृत्तीधारकांना जॅकपॉट
पेन्शन, पीएफ, एटीएम, युपीआय सुविधा
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 17, 2026 | 11:07 AM

EPFO Pension PF Withdrawal: देशातील 7 कोटींहून अधिक नोकरदारांसाठी ईपीएफओने एका पाठोपाठ एक गिफ्ट देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी मोठे बदल होत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटणार आहे. केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटना कोट्यवधी सदस्यांना अनेक सोयी सुविधा देणार आहे. आता किमान पेन्शन 1000 हून वाढून 3000 रुपये होण्याची शक्यता आहे. तर EPFO 3.0 अंतर्गत लवकरच ATM आणि UPI मधून पैसे काढण्याची सुविधा मिळेल. काय आहे महत्त्वाची अपडेट?

पेन्शन 1000 रुपये, 3000 की थेट 7500 रुपये?

EPFO सिस्टिम डिजिटल आणि ऑटोमेटेड करण्याच्या तयारीत

PF रक्कम काढणे अधिक सोपे करण्यावर भर

ATM आणि UPI आधारीत पैसे काढण्याची सुविधा लवकरच

EPS-95 किमान पेन्शन वाढीवर सरकारचा गांभीर्याने विचार

निवृत्तीवेतन 1000 रुपयांहून 3000 रुपये वा 7500 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता

पेन्शन वाढीविषयी अद्याप अधिकृत अपडेट समोर नाही

ईपीएफओ लवकरच कात टाकणार

नोकरदार वर्गासाठी ईपीएफओ अनेक मोठे बदल करत आहे. हक्काचा पैसा झटपट आणि सहज काढता यावा याासाठी ईपीएफओने डिजिटल पाऊल टाकले आहे. आता लवकरच अनेक बदल होतील. आता सर्व प्रक्रिया डिजिटल होतील. कर्मचारी भविष्य निधी संघटना गेल्या काही दिवसांपासून EPFO 3.0 सारखी अपग्रेडेट सिस्टिम आणण्याची तयारी करत आहे. त्यामुळे पैसे काढण्याचा दाव्याचा लवकर निपटारा होईल. झटपट रक्कम काढता येईल. ऑनलाईन सुविधा मिळतील. कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईल. हायटेक तंत्राच्या वापरामुळे कार्यालयातील फाईलिंगची चिंता कमी होईल. डिजिटल सुविधेमुळे कागदाचा वापर कमी होईल. तर इतरही अनेक सुविधा मिळतील.

ATM मधून PF काढता येणार

EPFO ATM कार्ड सदस्यांना देईल

PF चा पैसा ATM वा UPI प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काढता येईल

खातेधारक थेट डिजिटल पद्धतीने रक्कम काढता येईल

Google Pay, PhonePe ॲपमधून निघणार PF?

EPFO सिस्टिम लवकरच UPI आणि डिजिटल बँकिंगशी जोडेल

दावा प्रक्रिया अगदी गतिमान होईल

त्यामुळे पैसे लवकर बँक खात्यात येतील आणि तो काढता येईल

अर्थात अद्याप Google Pay वा PhonePe wallet मधून PF काढता येणार की नाही याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Follow Us