AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO New Rule: नोकरी गेल्यानंतर PF खात्यातून पैसे काढण्याच्या नियमात बदल; ईपीएफओने घेतला सर्वात मोठा निर्णय

epfo : पीएफ खातेदारांसाठी महत्वाची माहिती हाती आली आहे. आता नोकरी गेल्यानंतर पीएफ खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत.

EPFO New Rule: नोकरी गेल्यानंतर PF खात्यातून पैसे काढण्याच्या नियमात बदल; ईपीएफओने घेतला सर्वात मोठा निर्णय
| Updated on: Jul 09, 2026 | 3:21 PM
Share

देशांतील नोकरदारांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. आता नोकरी गेल्यानंतर पीएफ खात्यातून पैसे काढण्याच्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. आता नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या 2-3 महिन्यांत खात्यातून सर्व पैसे काढता येणार नाही. ईपीएफओने नोकरी गेल्यानंतर खात्यातून पैसे काढण्याचा मुदत कालावधी 12 महिन्यांचा केला आहे. त्यामुळे आता बेरोजगार झाल्यावर 12 महिन्यांनी पीएफ खात्यातून सर्व पैसे काढता येणार आहे.

आता 12 महिन्यानंतर पैसे काढता येणार

ईपीएफओच्या (EPFO) जुन्या नियम आणि योजनेत 1952 अंतर्गत, पीएफ खातेधारक नोकरी गमावल्यानंतर आणि दोन महिन्यांच्या आत खात्यातील 100 टक्के रक्कम काढू शकते होते. ईपीएफओ योजना 2026 अंतर्गत या नियमात बदल करण्यात आलाय. आता कर्मचारी नोकरी गमावल्यानंतर लगेचच त्यांच्या पीएफ खात्यातील 75 टक्के काढू शकतात. तर उर्वरित 25 टक्के रक्कम ही 12 महिन्यानंतर काढता येऊ शकते. आता ईपीएफओ 25 टक्के रक्कम लॉक करणार आहे. तुम्ही तब्बल 12 महिने बेरोजदा राहाल, तेव्हा तुम्हाला उर्वरित 25 टक्के रक्कम मिळेल.

काय आहे नियम?

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सामाजिक सुरक्षा 2025 नियमांतर्गत पीएफच्या नियमात मोठे बदल केले आहेत. याआधी बेरोजगार झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात पीएफ खात्यातील पैसे काढता यायचे. आता नव्या नियमानुसार बेरोजगार झाल्यानंतर पैसे काढण्याच्या मुदत कालावधीत बदल केला आला आहे. नोकरदार बेरोजगार झाल्यानंतर 25 टक्के 12 महिन्यानंतर काढू शकतो.

पीएफचे व्याज कधी मिळणार?

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी पीएफबाबत (PF) ही मोठी घोषणा केली आहे. EPFO आर्थिक वर्षाचं वार्षिक व्याज हे पीएफधारकांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यांनी यावेळी अधिकृत तारीख देखील सांगितली. मंत्री मनसुख मांडविया यांच्या घोषणेमुळे पीएफधारकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 व्याज हे 15 जुलै रोजी खातेदारांच्या खात्यात जमा होईल. याआधी व्याज हे सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात जमा व्हायचे. यंदा जुलैच्या मध्यापर्यंत ग्राहकांच्या खात्यात जमा होईल.

Follow Us
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....