EPFO New Rule : EPF खात्यातून संपूर्ण रक्कम काढा, नवीन नियमामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

EPFO Big Update: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कोट्यवधी सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या(CBT) बैठकीत अनेक मोठ्या बदलांना मंजूरी देण्यात आली आहे. सदस्यांना महत्त्वाच्या वेळी पैसे काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

EPFO New Rule : EPF खात्यातून संपूर्ण रक्कम काढा, नवीन नियमामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
ईपीएफओ
| Updated on: Oct 14, 2025 | 11:49 AM

EPFO New Rule : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 238 व्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्याचा फायदा देशातील कोट्यवधी सदस्यांना होईल. केंद्रीय कामगार मंत्री डॉ. मनसुख मंडाविया यांच्या अध्यक्षतेखाली ईपीएफओच्या बोर्डाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. आता कर्मचारी त्यांच्या खात्यातील 100% “Eligible Balance” म्हणजे कर्मचारी आणि नियोक्ता, कंपनी यांचे योगदान काढू शकतील. तर आंशिक रक्कम काढण्याचा नियम पण सोपा आणि पारदर्शक करण्यात आला आहे. या नवीन नियमांमुळे पैसे काढताना त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नियम अधिक सोपी आणि सुटसुटीत करणे, ईपीएफमध्ये अंशतः रक्कम काढण्याची (Partial Withdrawal) सुविधा देणे. विश्वास योजनेतंर्गत याचिका, प्रकरणांचा भार कमी करणे. डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सेवा घरपोच पोहचवणे. ईपीएफओ 3.0 च्या आधुनिकीकरणाला मंजूरी देणे असे बदल करण्यात आले आहे. आतापर्यंत रक्कम काढण्यासाठी वेगवेगळ्या स्थितीसाठी 13 प्रकारचे नियम होते. आता ते तीन सोप्या श्रेणीत वाटले जातील. आजारी, शिक्षण,घर बांधकामासाठी आणि लग्नासाठी ही रक्कम काढण्यात येते.

आता 100% रक्कम काढता येणार

EPFO ने 13 किचकट नियम रद्द केले आहेत. आता केवळ तीन श्रेणीत त्यांना आंशिक रक्कम काढण्याचा नियम देण्यात आला आहे. यामध्ये आजारपण, शिक्षण, लग्न आणि घरासाठ तसेच अत्यंत गरजेच्या वेळी पैसे काढता येतात. आता ईपीएफओ सदस्य त्यांच्या PF खात्यातील सध्याची संपूर्ण रक्कम (कर्मचारी आणि कंपनी) काढता येईल. पूर्वी शिक्षण आणि लग्न कार्यासाठी केवळ 3 वेळा रक्कम काढण्याची मंजुरी होती. तर आता शिक्षणासाठी 10 वेळा आणि लग्नासाठी 5 वेळा रक्कम काढू शकतील. याशिवाय कमीतकमी सेवा कालावधी कमी करून तो 12 महिन्यांवर आणण्यात आला आहे. सर्वात मोठा निर्णय आता कर्मचारी त्यांच्या खात्यातील जमा रक्कम 100 टक्क्यांपर्यंत काढू शकतील. यामध्ये कर्मचारी आणि नियोक्ता, कंपनीचा वाटा यांचा सहभाग असेल.

25% कमीत कमी शिल्लक गरजेची

EPFO ने हे निश्चित केले आहे की सदस्यांच्या खात्यात नेहमी 25 टक्के रक्कम शिल्लक असणे गरजेचे आहे. यामध्ये सदस्यांना 8.25 टक्के व्याज दर आणि चक्रवाढ व्याज म्हणजे कम्पाऊंड व्याज मिळण्याचा फायदा मिळेल. त्यामुळे सेवानिवृत्तीसाठी मोठा फंड तयार होईल. तर नैसर्गिक फायदा, बेरोजगारी, महामारी या कारणांचा रक्कम काढताना उल्लेख करावा लागत होता. अशावेळी अनेकदा त्यांचा दावा फेटाळला जात होता. आता ही अडचण दूर करण्यात आली आहे. सदस्यांना खास परिस्थितीत कोणत्याही कारणाशिवाय रक्कम काढता येईल.