
EPFO family pension rules 2025: जर एखाद्या ईपीएफओ सदस्याला दोन बायका असतील तर कुटुंब निवृत्ती वेतन रक्कम (EPFO pension for two wives India) कोणत्या पत्नीला मिळेल? हा प्रश्न सर्वसामान्यांना कायम भेडसावतो. अनेकांना याचं उत्तर काय आहे, याची उत्सुकता असते. अनेकदा मोठ्या कुटुंब कबिल्यात यावरून वाद होतात. कोर्टकचेरीपर्यंत हे प्रकरण पोहचते. मग पहिल्या पत्नीला की दुसऱ्या पत्नीला पेन्शनचा लाभ मिळेल याविषयीची कायद्यात काय तरतूद आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ईपीएफओचा या विषयीचा नियम सांगतो काय?
EPFO च्या नियमानुसार, कुटुंब निवृत्ती वेतन तेव्हाच दुसऱ्या पत्नीलाही देण्यात येते, जेव्हा ते लग्न कायदेशीररित्या वैध असते. जर दुसरी पत्नी कायदेशीररित्या लग्न करून आणलेली असेल तर ती पण निवृत्ती वेतनाची हकदार ठरते. अर्थात यासाठी दुसऱ्या पत्नीला कायदेशीर पुरावा सादर करावा लागतो. याविषयीची कागदपत्रं ईपीएफओ कार्यालय मागू शकते. ते त्यावेळी सादर करावी लागतात.
दोन पत्नीपैकी कुणाला मिळेल पेन्शन?
आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो की जर दोन पत्नी असतील. तर पेन्शन (who gets family pension if two wives) कुणाला मिळेल? EPFO चा याविषयीचा स्पष्ट नियम आहे. त्यानुसार पहिली पत्नी ही पेन्शनची हकदार असते. तिला कुटुंब निवृत्ती योजनेचा लाभ मिळेल. जी पत्नी लग्न होऊन पहिल्यांदा घरात आली. तिला पेन्शन अगोदर मिळेल. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला दोन कायदेशीर पत्नी असतील, दोन्ही लग्नाला कायदेशीर मान्यता असेल तर कुटुंबाची निवृती वेतन त्याच व्यक्तीला देण्यात येते जिचे पहिले लग्न झाले आहे. पेन्शनचा अधिकार पहिल्या पत्नीला मिळतो. पहिल्या पत्नीला हा अधिकार मिळतो.
दुसऱ्या पत्नीला केव्हा मिळते पेन्शन?
आता अजून एक प्रश्न उरतो की दुसऱ्या पत्नीला केव्हा पेन्शन मिळेल? तर त्यासाठी EPFO चा स्पष्ट नियम आहे. जर पहिल्या पत्नीचे निधन झाले असेल तर दुसऱ्या पत्नीला पेन्शन मिळू शकते. दोन्ही लग्न वैध, कायदेशीर असेल तर पेन्शन एकाचवेळी दोन्ही पत्नीला देण्यात येत नाही. पेन्शन ही क्रमिक पद्धतीनेच देण्यात येते. पहिली पत्नी आणि नंतर दुसरी पत्नी असा हा नियम आहे. अर्थात याप्रकरणी दुसरी पत्नी न्यायालयात दाद मागू शकते. न्यायालयात त्यात नियम आणि युक्तीवादानुसार निकाल देईल.