AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PF खात्यात 1 लाख जमा.. मग 25, 50 की 75 हजार… किती काढता येणार? नियम काय?

EPFO PF Withdrawal Rules : तुमच्या पीएफ खात्यात 1 लाख रुपये असतील तर निकडीच्या वेळी तुम्ही 25, 50 की 75 हजार किती रक्कम काढू शकता? काय आहे याविषयीचा नियम?

PF खात्यात 1 लाख जमा.. मग 25, 50 की 75 हजार... किती काढता येणार? नियम काय?
PF खात्यात 1 लाख जमा.. मग 25, 50 की 75 हजार... किती काढता येणार?
| Updated on: Oct 14, 2026 | 8:30 AM
Share

EPFO PF Withdrawal Rules : खासगी नोकरदार वर्गाला ईपीएफओचा मोठा आधार आहे. त्यांच्या वेतनातील एक ठराविक रक्कम दरमहा पीएफ खात्यात जमा होते. वैद्यकीय अडचण, मुलांचे शिक्षण, लग्न, गृहखरेदी अशा निकडीच्यावेळी पीएफ खात्यातील रक्कम कर्मचाऱ्यांना काढता येते. पण पीएफ खात्यातून किती रक्कम काढता येते, याविषयी कर्मचार्‍यांच्या मनात नेहमी संभ्रम असतो. जर पीएफ खात्यात 1 लाख रुपये असतील तर गरजेच्यावेळी कर्मचारी 25, 50 की 75 हजार किती रक्कम काढू शकतात? काय आहे याविषयीचा नियम?

वैद्यकीय उपचारांसाठी किती रक्कम काढता येणार?

EPFO च्या नियमानुसार, वैद्यकीय उपचारांसाठी पीएफ खात्यातून कर्मचारी आगाऊ रक्कम काढू शकतो. ही रक्कम काढण्याची मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. समजा तुमच्या खात्यात 1 लाख रुपये जमा आहेत. तर तातडीच्या वैद्यकीय कारणासाठी कर्मचारी नवीन नियमानुसार, 75 टक्के रक्कम काढू शकतो. म्हणजे एक लाख रुपयांमधून तो 75 हजार रुपये आगाऊ रक्कम म्हणून काढू शकतो.

नोकरी गमावल्यास, बेरोजगार असल्यास नियम काय सांगतो

एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी सुटल्यास, बेरोजगार झाल्यास त्याला महिन्याच्या आत पीएफ खात्यातील एकूण रक्कमेपैकी 75 टक्के रक्कम काढण्याचा अधिकार मिळतो. म्हणजे एक लाखांपैकी त्याला 75 हजार रुपये मिळतात. तर उर्वरीत 25 हजार रुपये तो पुढील एका वर्षात पूर्णपणे बेरोजगार राहिल्यास काढता येतात. कर्मचाऱ्यांची भविष्यातील आर्थिक सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी मात्र पीएफ खात्यात 25 टक्के रक्कम शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. पण बेरोजगार असताना हा नियम लागू होत नाही.

शिक्षण आणि लग्नासाठीचा नियम काय?

मुलांचे उच्च शिक्षण अथवा लग्नकार्यासाठी पीएफ खात्यातून रक्कम काढता येते. पीएफ खात्यातील एकूण रक्कमेपैकी कर्मचारी 50 टक्क्यांपर्यंतची रक्कम काढू शकतात. त्यासाठी एक अट आहे. त्यानुसार किमान 7 वर्षांची सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.

पीएफ काढण्याची प्रक्रिया सोपी

ईपीएफओने पीएफ काढण्याची किचकट प्रक्रिया सोपी केली आहे आणि विविध श्रेणी कमी केल्या आहेत. आता वैद्यकीय उपचार आणि आपत्कालीन कारणांसाठी सदस्य उमंग(UMANG) ॲपचा वापर करू शकतात. ते ईपीएफओच्या अधिकृत पोर्टलवर जाऊनही पीएफ रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात.

Follow Us
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी