AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPF Balance: व्याजाची रक्कम जमा झाली की नाही? या चार सोप्या पद्धतीने तपासा

PF Interest Credit 2025-26: केंद्रीय कर्मचारी निर्वाह निधी संघटनेने कर्मचार्‍यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा केली आहे. ही रक्कम तुम्हाला या सोप्या चार पद्धतीने तपासता येणार आहे. मोबाईलवर कर्मचाऱ्यांना सहज ईपीएफमधील बॅलन्स तपासता येईल.

EPF Balance: व्याजाची रक्कम जमा झाली की नाही? या चार सोप्या पद्धतीने तपासा
ईपीएफओ बॅलन्स
| Updated on: Jul 24, 2026 | 4:18 PM
Share

PF Interest Credit 2025-26: केंद्रीय कर्मचारी निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली आहे. EPFO ने आर्थिक वर्ष 2025-26 साठी पीएफ खात्यात व्याज जमा करायला सुरूवात केली आहे. अनेकांना याविषयीचा मॅसेजही आला असेल. जर पीएफ खाते अथवा पासबुकमध्ये आतापर्यंत व्याज जमा झाल्याची नोंद दिसत नसेल तर चिंता करण्याची गरज नाही. काही सोप्या पद्धतीने तुम्ही पीएफ व्याज आणि बॅलन्सची माहिती मिळवू शकता.

पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली की नाही हे तपासणे सोपे आहे. या चार पद्धतीने कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासता येईल.

1- UMANG ॲपमधून असे तपासा PF व्याज

EPFO च्या सेवांचा लाभ घेण्यासाठी UMANG ॲपचा फायदा होतो. त्यासाठी ॲपमध्ये जा.

EPFO Services हा पर्याय निवडा

येथे UAN आणि आवश्यक माहिती टाकून लॉगिन करा

लॉगिन केल्यानंतर PF बॅलेन्स आणि जमा झालेले व्याज याची माहिती समोर येईल

2- मिस्ड कॉल आणि SMS या माध्यमातून माहिती

मोबाईल क्रमांक अगोदरच UAN शी लिंक असेल आणि KYC अपडेट केले असेल तर विना इंटरनेट सुद्धा तुम्ही PF खात्यातील बचतीची आणि व्याजाची माहिती घेऊ शकता.

त्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 9966044425 या क्रमांकवर मिस्ड कॉल द्या

काही वेळेत तुमच्या मोबाईलवर PF बॅलन्सविषयीची माहिती SMS द्वारे मिळेल.

3- SMS द्वारे असे तपासा पीएफ बॅलेन्स

मोबाईलच्या मॅसेज बॉक्समध्ये जा

आता EPFOHO UAN असा मॅसेज टाईप करा

यानंतर तो 7738299899 वर पाठवा

आता तुम्हाला SMS द्वारे खात्यातील शिल्लक रक्कमेचा तपशील मिळेल

पण या सेवेसाठी तुमचा UAN सक्रिय (Activated) असणे आवश्यक आहे

EPFO Passbook पुन्हा तपासा

तुम्ही काही दिवसांपूर्वी तुमचे EPF Passbook तपासले असेल आणि त्यावेळी व्याज रक्कम जमा झाली नसेल तर आता पुन्हा व्याजाची रक्कम जमा झाली की नाही हे आता तपासा. कारण ईपीएफओने व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.

4- कसे आणि कुठे तपासणार PF पासबुक?

EPFO ची अधिकृत पासबुक साईट passbook.epfindia.gov.in वर जा

याठिकाणी UAN आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा

कर्मचाऱ्यांनी सदस्य आयडी (Member ID) निवडा

पासबुकमध्ये वर्ष 2025-26 मधी एंट्री तपासा

सदस्य Interest Credit मध्ये जाऊन रक्कम जमा झाल्याचे तपासू शकता.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम