
देशाचा अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर 1 फेब्रुवारी रोजी मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण अर्थसंकल्प सादर करतील. निर्मला सितारमण अर्थमंत्री झाल्यापासून नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात काय असेल? याची उत्सुकता लागून आहे. या अर्थसंकल्पानंतर दैनंदिन जीवनावर प्रभाव पडणार हे मात्र नक्की.. काही वस्तू स्वस्त, तर काही वस्तू महाग होणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात या अर्थसंकल्पाचा फरक पडणार हे निश्चित आहे. पण काही जणांना या अर्थसंकल्पातला फार काही कळत नाही. आयकराच्या सीमेत येत नसल्याने त्यांना या अर्थसंकल्पाशी काही देणं घेणं नसतं. तुम्हालाही असंच वाटत असेल तर असा विचार अजिबात करू नका. कारण अर्थसंकल्प तुमच्या दैनंदिन खर्चापासून ते तुमच्या मुलांचे शिक्षण, नोकरी आणि बचतीपर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम करतो. मजूर, कामगार आणि गृहिणी जरी आयकरच्या सीमेत येत नाही त्यांनाही अर्थसंकल्प समजून घेणं महत्त्वाचं आहे. गरिबांसाठी सर्वात मोठी समस्या बेरोजगारी आणि महागाई आहे. चला तुमच्या आयुष्यावर या अर्थसंकल्पाचा काय फरक पडेल ते समजून घेऊयात… ...