DA : अखेर प्रतिक्षा फळाला, देवी पावली केंद्रीय कर्मचाऱ्यांना, आता महागाईशी करणार दोन हात..

| Updated on: Sep 28, 2022 | 3:28 PM

DA : केंद्रीय कर्मचाऱ्यांचे नशीब अखेर फळाला आले. त्यांना केंद्र सरकारने इतका महागाई भत्ता दिला, तुम्हाला महागाई भत्ता मिळाला का?

DA : अखेर प्रतिक्षा फळाला, देवी पावली केंद्रीय कर्मचाऱ्यांना, आता महागाईशी करणार दोन हात..
आनंद गगनात मावेना
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : महागाईशी (Inflation) सामना करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) अखेर सरकारी कर्मचाऱ्यांना बळ दिले. केंद्र सरकारचे कर्मचारी जुलै महिन्यांपासून महागाई भत्ता (Dearness Allowances) मिळण्याच्या प्रतिक्षेत होते. त्यांची प्रतिक्षा अखेर पळाला आली. केंद्र सरकारने आज झालेल्या बैठकीत त्यांना दिवाळी बंपर गिफ्ट दिले.

 

हे सुद्धा वाचा

आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 4 टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला. या महागाई भत्त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 34 टक्के नव्हे तर आता 38 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.

 

जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचारी महागाई भत्त्याच्या प्रतिक्षेत होते. पण त्यांना भत्ता मिळालेला नव्हता. ऑगस्टपर्यंत भत्ता न मिळाल्याने कर्मचारी चिंतेत होते. तसेच याविषयीचा निर्णय ही घेण्यात आलेला नव्हता. DA देण्याच्या निर्णयाचा 50 लाख कर्मचारी आणि 62 लाख निवृत्तांना लाभ मिळणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकाशी जोडलेला आहे. त्याआधारे महागाई भत्ता ठरवण्यात येतो. मे, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील निर्देशांकानुसार महागाई भत्ता ठरविण्यात आला.

अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकांचा (Indian Consumer Price Indices) आकडा सतत वाढत गेला तर त्याचा परिणाम महागाई भत्यावरही दिसून येतो. त्यानुसार महागाई भत्ताही वाढवला जातो. यावेळी ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7 टक्क्यांवर गेला होता.

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ गृहित धरण्यात आली होती. त्यामुले डीए 38 टक्के झाला. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता.

7 व्या वेतन आयोगाअंतर्गत किमान मूळ वेतन 18,000 रुपये असल्यास 38 टक्के दराने वार्षिक महागाई भत्त्यात एकूण 6,840 रुपये वाढतील. म्हणजेच सध्याच्या महागाई भत्त्याच्या तुलनेत दरमहा 720 रुपये वाढणार आहेत. एकूण, 18000 रुपये मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षाला 8640 रुपये अधिक महागाई भत्ता मिळेल.