मोठा झटका! HDFC सह ‘या’ दोन बँकांनी FD व्याज दरात केली कपात, वाचा नवे दर

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 आणि 2 वर्षांत मुदतीच्या ठेवींचे (Maturity) व्याज दर कमी केले आहेत.

मोठा झटका! HDFC सह 'या' दोन बँकांनी FD व्याज दरात केली कपात, वाचा नवे दर
आतापर्यंतच शासकीय कामकाजाची वेळ ही 10 ते 5 होती. मात्र आता बँका सकाळी 10 ऐवजी 9 वाजता उघडणार आहेत. त्यामुळे तुम्ही ऑफिसला जाण्यापूर्वी बँकांशी निगडीत काम पूर्ण करु शकता.
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 8:15 AM

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी एचडीएफसी बँक (HDFC Bank) ने आणखी एक मोठा बदल केला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये बँकेने एफडी व्याज दरातही बदल केला होता. त्यानंतर आता काही निश्चित ठेवींवरील (FD) व्याज दरात (Interest rate) कपात केली आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 आणि 2 वर्षांत मुदतीच्या ठेवींचे (Maturity) व्याज दर कमी केले आहेत. तर इतर काळातील (Tenure) एफडीमध्ये व्याज दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे नवीन दर 13 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. (for fixed deposits hdfc bank has changed interest rates know how much interest)

काय आहेत एफडीवरील नवीन दर HDFC बँकेच्या ग्राहकांना आता एक वर्षाच्या आणि 2 वर्षाच्या एफडीवर 4.90 टक्के व्याज मिळणार आहे. नव्या दरांनुसार आता 7 ते 14 दिवस आणि 15 ते 29 दिवसांत मॅच्यूरिटी होणाऱ्या एफडीवर ग्राहकांना 2.5 टक्के व्याज मिळेल. तर 30 ते 45 दिवस, 46 ते 60 दिवस आणि 61 ते 90 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के व्याज मिळेल.

याशिवाय 91 टक्के ते 6 महिन्यांत मॅच्यूरिटी होणाऱ्या एफडीवर 3.5 टक्के व्याज आहे. तर 6 महिन्यांपासून 9 महिन्यांत आणि 9 महिन्यांपासून ते एका वर्षाच्या मुदतीत एफडीवर 4.4 टक्के व्या मिळेल. एक आणि 2 वर्षांच्या एफडीवर 9.9 टक्के, दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत 5.15 टक्के, तीन ते पाच वर्षांच्या एफडीवर 5.30 टक्के आणि पाच ते दहा वर्षांच्या कालावधीत एफडीवर 5.50 टक्के व्याज आहे.

अ‍ॅक्सिस बँकेच्या एफडीवरील व्याज दरातही बदल एफडीवरील व्याज दरात खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेनेही (Axis Bank) बदल केला आहे. 13 नोव्हेंबरपासून नवीन दर लागू करण्यात आले. अ‍ॅक्सिस बँक 7 ते 29 दिवसांच्या एफडीवर 2.50 टक्के, 30 दिवस ते 3 महिन्यांपेक्षा कमी एफडीवर 3 टक्के आणि 3 महिने ते 6 महिन्यांपेक्षा कमी एफडीवर 3.5 टक्के व्याज निश्चित केला आहे. (for fixed deposits hdfc bank has changed interest rates know how much interest)

याशिवाय, सहा महिन्यांपेक्षा 11 महिने आणि 25 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ग्राहकांना 4.40 टक्के व्याज दर द्यावा लागेल. 11 महिन्यांच्या 25 दिवसांपेक्षा कमी 1 वर्ष 5 दिवसांपेक्षा कमी एफडीवर 5.15 टक्के व्याज आणि 18 महिन्यांपासून ते 2 वर्षांपेक्षा कमी वेळेच्या एफडीवर 5.25 टक्के व्याज दर आहे.

भारतीय स्टेट बँकेचे काय आहे व्याज दर ? देशातील सर्वात मोठी सरकारी कर्जदार स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 7 ते 45 दिवसांत एफडीवर 2.9 टक्के व्याज आहे. 46 ते 179 दिवसांच्या ठेवींवर 9.9 टक्के, 180 ते 210 दिवसांवर 4.4 टक्के आणि 4.4 व्याज दिलं जातं आहे.

ग्राहकांसाठी एक ते दोन वर्षात एफडीवर 4.9 टक्के व्याज आहे, दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत एफडीवर 5.1 आणि तीन ते पाच वर्षाच्या मुदत ठेवींवर 5.30 टक्के व्याज मिळत आहे. त्याचबरोबर 5 ते 10 वर्षांच्या मुदतीच्या एफडीवर 5.40 टक्के व्याज दिलं जात आहे.

इतर बातम्या –

सर्वात कमी व्याजदराने देशातील सर्वाधिक कर्ज, ठाकरे सरकारचा जर्मनीच्या केएफडब्ल्यू बँकेशी करार

गृहकर्जदारांसाठी दिलासादायक बातमी; आणखी एका बँकेनं घटवले व्याजदर

(for fixed deposits hdfc bank has changed interest rates know how much interest)

Non Stop LIVE Update
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.