EPFO च्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करून कोट्यधीश बना, फॉर्म्युला समजून घ्या

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (EPFO) PF योजना ही अत्यंत खास योजना आहे. या योजनेत कर्मचारी थोडी फार गुंतवणूक करून निवृत्तीसाठी निधी गोळा करू शकतात. PF योजनेत कर्मचाऱ्यांना दरमहा नियमित गुंतवणूक करावी लागते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही कोट्यधीश बनू शकता.

EPFO च्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करून कोट्यधीश बना, फॉर्म्युला समजून घ्या
EPFO
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Mar 09, 2025 | 7:07 PM

तुम्ही आताच जॉब किंवा नोकरी सुरू केली आहे का? तुम्ही नुकतीच कोणत्याही ठिकाणी नोकरी सुरू केली असेल तर आताच तुम्ही या योजनेत पैसे टाकून कोट्यधीश होण्याची वाट मोकळी करू शकतात. हो. आम्ही सत्य बोलत आहोत. फक्त यात सतत्य असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला काही वर्ष दर महिन्याला ठरावीक रक्कम ही PF खात्यात टाकावी लागेल. त्यानंतर हा निधी तुम्हाला एका ठरावीक कालावधीनंतर मोठी रक्कम देऊ शकतो. या PF योजनेविषयी पुढे विस्ताराने जाणून घ्या.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (EPFO) PF योजना ही अत्यंत खास योजना आहे. या योजनेत कर्मचारी थोडी फार गुंतवणूक करून निवृत्तीसाठी निधी गोळा करू शकतात. PF योजनेत कर्मचाऱ्यांना दरमहा नियमित गुंतवणूक करावी लागते.

PF योजनेतील हे पैसे दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या पगारातून कापले जातात. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. निवृत्तीनंतर तुम्ही PF चे पैसे काढू शकता. हे पैसे तुम्ही पेन्शन म्हणूनही घेऊ शकता.

तुम्हाला नुकतीच नोकरी मिळाली असेल तर तुम्ही PF योजनेत गुंतवणूक सुरू करावी. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही कोट्यधीश बनू शकता. चला जाणून घेऊया कसे.

कोट्यधीश कसे बनाल?

समजा जर तुम्ही 30 वर्ष काम करत असाल आणि दरमहा तुमच्या पगाराचा काही भाग PF मध्ये गुंतवत असाल तर तुम्ही 30 वर्षात मोठा फंड जोडू शकता. जर तुम्ही PF खात्यात दरमहा 7200 रुपये गुंतवले तर तुम्ही 30 वर्षांत 1.10 कोटी रुपयांपर्यंतचा फंड जोडू शकता. यामध्ये सरकार 8.25 टक्के व्याजदराने परतावा देते.

EPF चे फायदे

EPF मध्ये गुंतवणूक केल्यानंतर निवृत्तीनंतर तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळू शकते. पेन्शन कॉर्पस कंपनीच्या EPF मधील 12 टक्के योगदानातून तयार केला जातो. मात्र, पेन्शन मिळवण्यासाठी 10 वर्ष नोकरी केलेली असावी. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या PF खात्यात नॉमिनी निवडू शकता.

लक्षात घ्या, तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी रक्कम जरी जमा केली तरी तुमच्याकडे काही वर्षांनी मोठा निधी असू शकतो. फक्त तुम्हाला सातत्याने ही रक्कम दर महिन्याला बचत करावी लागेल. वर आम्ही तुम्हाला PF च्या योजनेविषयी सांगितले. असेच अनेक पर्याय आहेत, तज्ज्ञांच्या सल्लाने त्याचाही तुम्ही वापर करू शकतात.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)