भारत-यूके दरम्यान फ्री ट्रेड करार, PM मोदी म्हणाले ऐतिहासिक क्षण, स्टार्मर यांच्या स्वागतास उत्सुक

केंद्रीय वाणिज्य मंत्री यांच्या २८ एप्रिलच्या लंडन दौऱ्यानंतर दोन्ही देशांनी २९ एप्रिल रोजी दोन्ही देशांनी चर्चा समाप्तीची घोषणा करण्याची आशा व्यक्त केली होती. परंतू शेवटच्या वेळी चर्चेला मुदतवाढ दिली होती...

भारत-यूके दरम्यान फ्री ट्रेड करार, PM मोदी म्हणाले ऐतिहासिक क्षण, स्टार्मर यांच्या स्वागतास उत्सुक
| Updated on: May 06, 2025 | 8:33 PM

भारतआणि ब्रिटन यांच्यात एक व्यापक व्यापार कराराची घोषणा करण्यात आली आहे.करारांतर्गत बहुतांशी वस्तू आणि सेवांवरील टॅरिफ हटावण्यात आले आहे. हा मुक्त व्यापाराचा करार नवी दिल्ली आणि अमेरिकेसह अन्य देशांदरम्यान अशाच प्रकारे होणाऱ्या कराराला मार्गदर्शक ठरू शकतो असे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करीत या कराराची घोषणा केली आहे. हा करार मैलाचा दगड साबित होऊ शकतो असे मोदी यांनी म्हटले आहे. आपण पीएम कीर स्टारमर यांना भेटण्यासाठी उत्सुक आहोत असेही एक्सवर पोस्ट टाकत मोदी यांनी म्हटले आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्री गोयल आणि यूकेचे व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांनी नऊ महिन्यांच्या विरामानंतर २४ फेब्रुवारी रोजी चर्चा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. ९ एप्रिल रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या यूके भेटीमुळे चर्चांना आणखी चालना मिळाली, त्या दरम्यान त्यांनी पंतप्रधान स्टारमर, चान्सलर राहेल रीव्हज आणि रेनॉल्ड्स यांची भेट घेतली. व्यापार, गुंतवणूक आणि सामाजिक सुरक्षेशी संबंधित तांत्रिक-कायदेशीर बाबींमुळे हा विलंब झाला. व्यापार गतिमानतेबद्दल नवी दिल्लीच्या चिंता आणि ऑटोमोबाईल्स आणि स्कॉच व्हिस्कीसाठी अधिक बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या लंडनच्या मागण्यांवर वाटाघाटी करणाऱ्यांनी तोडगा काढला.

येथे पाहा पोस्ट –

पीएम मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘एका ऐतिहासिक टप्प्यात, भारत आणि ब्रिटनने दुहेरी योगदान करारासह एक महत्त्वाकांक्षी आणि परस्पर फायदेशीर मुक्त व्यापार करार यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या ऐतिहासिक करारांमुळे आमची व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल आणि आमच्या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार, गुंतवणूक, वाढ, रोजगार निर्मिती आणि नवी उपक्रमाला चालना मिळेल.