Fuel Price Hike: देशावर मोठे संकट, पेट्रोल आणि गॅसच्या किंमती भडकणार? लाल समुद्रात कुणाची दादागिरी?

Fuel Price Hike: देशात पेट्रोल आणि डिझेलसह गॅसच्या किंमत भडकण्याची शक्यता आहे. लाल समुद्रात सध्या हुती बंडखोरांनी नाकाबंदीची घोषणा केल्याने इंधन आणि इतर वस्तूंच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Fuel Price Hike: देशावर मोठे संकट, पेट्रोल आणि गॅसच्या किंमती भडकणार? लाल समुद्रात कुणाची दादागिरी?
कच्चा तेलाच्या किंमती भडकण्याची शक्यता
| Updated on: Jul 21, 2026 | 1:41 PM

Yemen Houthi rebels on Saudi Arabia: मध्य-पूर्वेतील युद्धामुळे अगोदरच पेट्रोल आणि डिझलेच्या किंमती भडकल्या आहेत. त्यातच अजून एक संकट ओढावले आहेत. पेट्रोल आणि डिझेल किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. यमनमधील हुती बंडखोरांनी सौदी अरबविरोधात लाल समुद्रात नाकाबंदीची घोषणा केली आहे. या नाकाबंदीमुळे या समुद्रातून होणारी इंधन आणि वस्तू, साहित्याच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात पेट्रोलसह घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक देशांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. महागाईत वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे गणित बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.

या मार्गे येते कच्चे तेल

लाल समुद्रातून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि इतर साहित्य दुसर्‍या देशात पोहचवले जाते. गाझा पट्टीतील युद्धा दरम्यान हुती बंडखोरांनी लाल समुद्रात आणि अदानच्या खाडीत, आखातात अनेक जहाजांना लक्ष्य केले होते. विशेष म्हणजे या समुद्री मार्गातच सौदी अरबचे यानबू बंदर सुद्धा आहे. या मार्गे मोठ्या प्रमाणात कच्चा तेलाची निर्यात करण्यात येते. बंडखोरांनी तेलवाहक जहाजांवर हल्ले चढवले तर तणाव वाढेल आणि त्याचा परिणाम कच्चा तेलाच्या पुरवठ्यावर होऊ शकतो.

नाकाबंदी करण्याचा निर्णय का घेतला?

सौदी अरबने आगळीक केल्यानेच नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतल्याचे हुती बंडखोरांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी आरोप केला आहे की सौदी अरबने त्यांच्या बंदरासह हवाई तळांवर निर्बंध टाकले आहेत. जर सौदीने याविषयीचा लवकर मार्ग काढला नाही तर सौदीला कडक भाषेत समज देण्यात येईल असे हुतींनी बजावले आहे. या घडामोडींमुळे येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलसह गॅसच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत होणार वाढ?

बाबा-अल-मंडेब स्ट्रेट हा लाल समुद्र आणि अदन आखाताशी जोडणारा समुद्री मार्ग आहे. लाल समुद्रातील याच मार्गे सौदी अरब हा कच्चे तेल आणि इतर साहित्य जगातील अनेक देशांपर्यंत पोहचवतो. जर या जलमार्गात अडथळे आले आणि तणाव वाढला तर त्याचा परिणाम कच्चा तेलाच्या पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. परिणामी पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे.

Follow Us