शेअर बाजारातील त्सुनामीने दिग्गजांचे धाबे दणाणले, अदानीच नाहीतर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी घट

| Updated on: Mar 14, 2024 | 9:58 AM

Adani Ambani Networth | बुधवारी शेअर बाजारात त्सुनामी आली. त्याचा फटका सर्वसामान्य गुंतवणूकदारांनाच नाही तर दिग्गजांना पण बसला. देशातील बड्या उद्योगपतींच्या संपत्तीत मोठी घट आली. गौतम अदानी, मुकेश अंबानी यांचा खिसा खाली झाला. त्यांच्या संपत्तीत इतकी घट आली.

शेअर बाजारातील त्सुनामीने दिग्गजांचे धाबे दणाणले, अदानीच नाहीतर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी घट
Follow us on

नवी दिल्ली | 14 March 2024 : शेअर बाजारात या आठवड्यातील सोमवार आणि बुधवार घातवार ठरले. या त्सुनामीने गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी रुपये बुडवले. या आपटी बारने सर्वसामान्य गुंतवणूकदारांनाच नाही तर दिग्गज कंपन्या, बड्या उद्योगपतींना झटका दिला. काल Sensex 1046 अंकांनी गडगडला होता. तर निफ्टीत 388 अंकांची घसरण झाली. त्याचा फटका सर्वांनाच सहन करावा लागला. यामध्ये आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांचा पण समावेश आहे.

अंबानी-अदानींचे इतके नुकसान

अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांचे 66,000 कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाले. या फटक्यामुळे ते 100 अब्ज डॉलर क्लबमधून बाहेर फेकले गेले. तर देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 36,000 कोटींची घसरण आली. दिग्गजांच्या संपत्तीत मोठी घसरण आली.

हे सुद्धा वाचा

गुंतवणूकदारांचे बुडाले 14 लाख कोटी

भारतीय शेअर बाजारात बुधवार घातवार ठरला. व्यापारी सत्रात सेन्सेक्स 1046 अंकांपर्यंत खाली आला. तर निफ्टी 388 अंकांनी घसरला. सेन्सेक्स 72,761.89 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 21,997.70 अंकांवर बंद झाला. या घसरणीत गुंतवणूकदारांचे बुधवारी जवळपास 14 लाख कोटी रुपये बुडाले.

अदानी 100 अब्ज डॉलर क्लब बाहेर

शेअर बाजारातील या घसरणीचा परिणाम जगातील सर्वात श्रीमंतांना बसला. यामध्ये गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांचा समावेश आहे. या दोघांना मोठा फटका बसला. अदानी समूहाचे मार्केट कॅप 90,000 कोटी रुपयांनी घसरले. गौतम अदानी यांच्या अनेक कंपन्यांना घसरणीचा फटका बसला. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांची संपत्ती 8 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 66,000 कोटी रुपयांनी घटली.

मुकेश अंबानी यांची संपत्ती इतकी घटली

शेअर बाजारातील घसरणीचा मोठा फटका बसला. फोर्ब्सच्या यादीनुसार, रिलायन्स चेअरमनला बुधवारी 4.42 अब्ज डॉलर वा जवळपास 36,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले. रिलायन्सचे मार्केट कॅप कमी होऊन 19.39 लाख कोटी रुपये झाले. रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने मुकेश अंबानी यांची संपत्ती 112.5 अब्ज डॉलर इतकी राहिली. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार, रिलायन्स चेअरमन यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत.