Gautam Singhania : नवाज मोदीला अगोदर आयुष्यातून काढले, आता कंपनीतून दाखवला बाहेरचा रस्ता

| Updated on: Apr 27, 2024 | 9:27 AM

Gautam Singhania Raymond Company : टेक्सटाईल कंपनी रेमंडमधील फॅमिली ड्रामा अजूनही सुरुच आहे. कंपनीचे मालक आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांनी पत्नी नवाज मोदी यांच्यातील वाद अजून चिघळला आहे.

Gautam Singhania : नवाज मोदीला अगोदर आयुष्यातून काढले, आता कंपनीतून दाखवला बाहेरचा रस्ता
अगोदर आयुष्यातून आता कंपनीतून केले बेदखल
Follow us on

32 वर्षांनी पत्नी नवाज मोदी हिला आयुष्यातून बाहेर करण्याची घोषणा रेमंड कंपनीचे प्रमुख गौतम सिंघानिया यांनी केली होती. गेल्या दिवाळीत त्यांनी सोशल मीडियावर याविषयीची भावनिक पोस्ट शेअर केली होती. पत्नीशी घटस्फोटाचा वाद सुरु असतानाच आता नवाज यांना रेमंड कंपनीच्या संचालक पदावरुन हटविल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे हा वाद आणखी भडकण्याची शक्यता आहे.

व्हिडिओमुळे खळबळ

32 वर्षांचा सुखी संसार दुराव्याच्या वळणावर मोडत असल्याचे गौतम सिंघानिया यांनी गेल्या दिवाळीत जगजाहीर केले होते. पत्नीपासून फारकतीचा निर्णय त्यांनी घेतला. तर रेमंड समूहाच्या दिवाळीच्या पार्टीत आमंत्रण देण्यात आले, पण आपल्याला प्रवेश देण्यात आला नाही असा आरोप नवाज मोदी यांनी एका व्हिडिओत केला होता. त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडिओ शेअर झाला. तो व्हायरल झाला. या व्हिडिओत त्या पार्टीस्थळी धरणे देत असल्याचे दिसून आले.

हे सुद्धा वाचा

एका वृत्तानुसार, नवाज यांनी पतीच्या एकूण 11,660 कोटींच्या संपत्तीत 75% टक्के वाटा मागितला आहे. ही रक्कम 8745 कोटी रुपये होते. यामध्ये दोन मुली निहारिका आणि निसा आणि नवाज यांचा वाटा असेल. सासरे डॉ. विजयपत सिंघानिया यांना एकूण संपत्तीत 50 टक्के वाटा, तर त्यांना 25 टक्के वाटा हवा आहे. मुलगी निहारिका आणि निसा यांच्या नावे प्रत्येकी 25 टक्के वाटा हवा असल्याची मागणी त्यांनी रेटली आहे.

नवाज मोदी यांना संचालक पदावरुन हटवले

रेमंड समूह आणि त्याच्याशी संबंधीत अन्य कंपन्यांच्या संचालक पदावरुन नवाज मोदी यांन गुरुवारी रात्री उशीरा हटविण्यात आले. त्यांच्याकडे जेके इन्व्हेस्टर्स, स्मार्ट ॲडव्हायझरी-फिनसर्व्ह आणि रेमंड कंझ्युमर केअर लिमिटिडेच्या संचालक मंडळात त्या महत्वाच्या ठिकाणी होत्या. त्यामध्ये संचालक पदाचा पण समावेश होता. आता त्यांना या तीनही पदावरुन हटविण्यात आल्याचे समोर येत आहे.

नवाज मोदी यांनी काय सांगितले

नवाज मोदी यांनी या घटनाक्रमावर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, त्या तीनही कंपन्यांच्या संचालकांच्या बैठकीत सहभागी झाल्या. त्यांनी संचालकांपुढे त्यांची बाजू मांडली. पण अनेक सदस्य त्यांना संचालक पदावरुन हटविण्याच्या बाजूने होते. कारण कंपनीचे मुख्य प्रवर्तक आणि बहुसंख्य शेअरधारक गौतम सिंघानिया यांचा आता माझ्यावर विश्वास राहिलेला नाही.

घरगुती हिंसेचा केला आरोप

नवाज मोदी यांनी पती गौतम सिंघानिया यांच्यावर कौटुंबिक छळाचा आरोप केला. पती मुलींना आणि आपल्याला मारझोड करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. मुलगी निहारिकाला गौतम यांनी 15 मिनिटे मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला होता.