हवाई क्षेत्राला ‘अच्छे दिन’; ‘गो फर्स्ट’ची सुपरडुप्पर ऑफर, नव्या वर्षाचा प्लॅन करताय?

| Updated on: Dec 21, 2021 | 6:49 AM

भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात 'गो फर्स्ट'नं पाऊल टाकलं आहे. त्यामुळे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नव्या वर्षाच्या मुहूर्तावर ऑफर घोषित केली आहे. बंगळुरु विमानतळावरुन उड्डाण करणाऱ्या विशिष्ट उड्डाणांवर ही ऑफर लागू आसणार आहे. तुम्ही बंगळुरुत राहत असाल आणि हवाई प्रवासाची इच्छा असल्यास तुम्ही मोफत प्रवासाचा लाभ घेऊ शकतात.

हवाई क्षेत्राला अच्छे दिन; गो फर्स्टची सुपरडुप्पर ऑफर, नव्या वर्षाचा प्लॅन करताय?
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नवी दिल्ली- कोविड प्रकोपामुळे अर्थचक्र मंदावली होती. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राला देखील मोठा फटका बसला. गेली दीड वर्षे विमानं जमिनीवरच लँड आहेत. लसीकरणाचा वाढता वेग आणि कोविडचा घटता प्रादूर्भाव यामुळे हवाई क्षेत्रानं पुन्हा भरारी घेतली आहे. विमान कंपन्यांनी प्रवाशांना आकर्षक ऑफर जारी केल्या आहेत. खासगी विमान वाहतूक कंपनी ‘गो फर्स्ट’ने (GoFirst) ऑफर घोषणेत आघाडी घेतली आहे. विशिष्ट उड्डाणांसाठी मोफत प्रवास आणि जेवण सुविधा देण्याची घोषणा कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे.

नेमकी ऑफर काय?

भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात ‘गो फर्स्ट’नं पाऊल टाकलं आहे. त्यामुळे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नव्या वर्षाच्या मुहूर्तावर ऑफर घोषित केली आहे. बंगळुरु विमानतळावरुन उड्डाण करणाऱ्या विशिष्ट उड्डाणांवर ही ऑफर लागू आसणार आहे. तुम्ही बंगळुरुत राहत असाल आणि हवाई प्रवासाची इच्छा असल्यास तुम्ही मोफत प्रवासाचा लाभ घेऊ शकतात. तुम्हाला यासाठी गो फर्स्ट एअरलाईन्सच्या वेबसाईटला भेट द्यायला हवी.

ट्विटद्वारे घोषणा:


GoFirst ने ट्विट करण्याद्वारे या ऑफरची माहिती दिली आहे. काय हवं? शानदार प्रवास की मोफत प्रवास आणि भोजन? खरं तर दोन्हीही! #Bengaluru वरुन निवडक उड्डाणांवर आकर्षक ऑफर

मोफत भरारी ‘या’ शहरांत:

‘गो फर्स्ट’ ने बंगळुरु वरुन मुंबई, दिल्ली,रांची,वाराणसी,कोलकाता,लखनौ आणि पुणे उड्डाण करणाऱ्या प्रवाशांसाठी मोफत सीट आणि भोजनाची ऑफर उपलब्ध असेल.

ऑफर कालावधी जाणून घ्या:

मोफत प्रवासाची ऑफर देणाऱ्या एअरलाईन्स कंपनी गोफर्स्टने आपल्या वेबसाईटवर मोफत प्रवास आणि मोफत भोजनाची ऑफर विषयी माहिती सादर केली आहे. www.flygofirst.com वेबसाईटवर तुम्हाला सविस्तर माहिती उपलब्ध असेल. ही ऑफर
16 डिसेंबर ते 10 जानेवारी, 2022 पर्यंतच उपलब्ध आहे.


..पण, एक ‘अट’:

गो-फर्स्टने आपल्या कंपनीच्या प्रसारासाठी ही ऑफर देऊ केली आहे. मात्र, ऑफरसाठी विशिष्ट अटही ठेवली आहे. ही ऑफर अहस्तांतरणीय आहे. तुम्ही तुमच्या नावावर तिकीट बुक केल्यास अन्य व्यक्तीच्या नावे तिकीट हस्तांतरित करू शकणार नाहीत. त्यामुळे ऑफरसाठी नोंदणी करताना निश्चितच सावधानता बाळगा.

हे सुद्धा वाचा:

1.80 कोटी ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या Toyota Hilux चं भारतीय रस्त्यांवर दर्शन, जानेवारी 2022 मध्ये बाजारात

मतदान कार्ड, पासपोर्ट पेक्षाही आधार कार्ड महत्त्वाचे; तुम्हाला आधारचे हे उपयोग माहिती आहेत का?