
Gold And Silver Future Rate : सध्या सोन्याच्या किमतीत जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव कधी जास्त तर कधी कमी होताना दिसतोय. कधीकाळी सोन्याचा भाव एक लाखांपेक्षा कमी होता. आता मात्र हेच सोने थेट एक लाख 20 हजारांच्याही पुढे गेले आहे. सोने तसेच चांदी या मौल्यवान धातूंच्या किमतीत होत अससेला हा बदल लक्षात घेता येणाऱ्या काळात सोन्याची वाटचाल कशी असेल असा प्रश्न विचारला जात आहे. असे असतानाच आता 2030 सालापर्यंत सोन्याचा भाव थेट सात ते साडेसात लाखांपर्यंत मजल मारू शकतो, असा मोठा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या लग्नसराई चालू झाली आहे. त्यामुळेच सोने आणि चांदीचा भाव सध्या वाढला आहे. मंगळवारी म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 3500 रुपयांनी वाढून थेट 1,28,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत सघरण झालेली पाहायला मिळत होते. आता मात्र 99.5 टक्के शुद्ध शोन्याचा भाव 3,500 रुपयांनी वाढून तो 1,28,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.
सध्याच्या जागतिक पातळीवरच्या घडामोडी, देशांतर्गत बाजाराचा बदलता कल लक्षात घेता सध्या सोने आणि चांदीच्या भावात चढउतार झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळेच सध्या जर मी सोन्यात गुंतवणूक केली तर 2030 सालापर्यंत त्याचा भाव किती होईल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भविष्यातील सोन्याचा भाव काय राहील याचा अंदाज लावायचा असेल तर भूतकाळात सोन्याचा भाव कसा वाढला, हे पाहावे लागेल. 2000 ते 2025 या एकूण पंचवीस वर्षांत सोन्याचा CAGR साधारम चौदा टक्के राहिलेला आहे. या 25 वर्षांत 2013, 2015 आणि 2021 हे तीन वर्ष वगळता सोन्याचा भाव सोन्याचा भाव वाढतच गेलेला आहे.
साधारण 25 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 साली 24 कॅरेट सोन्याचा भाव फक्त 4400 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता हाच भाव तब्बल 1.25 लाख रुपयांपर्यंत गेला आहे. 2000 ते 2025 या पंचवीस वर्षांत सोन्याच्या भावात सरासरी 25 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली. तुम्ही सध्या सोन्यात पाच लाख रुपये गुंतवले तर 2030 सालापर्यंत त्याचा भाव थेट दुप्पट होऊ शकतो, असे बोलले जात आहे. काही तज्ज्ञांच्या मतानुसार 2030 सालापर्यंत सोन्याचा भाव 2,50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो. तर काही रिपोर्ट्सनुसार 2030 सालापर्यंत 10 ग्रॅम सोन्याची किंमत साधारण 7 लाख ते 7.5 लाख रुपये असू शकते.