Gold Rate : सोने-चांदीचे भाव कमी होणार, सरकारने घेतला सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय

Gold Price : 1 लाख 60 हजारांच्या पुढे गेलेला सोन्याचा दर आता कमी होण्याची शक्यता आहे. कारण सरकारने सोने आणि चांदीच्या आयात किमतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Gold Rate : सोने-चांदीचे भाव कमी होणार, सरकारने घेतला सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय
Gold Price
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 04, 2026 | 10:24 PM

गेल्या काही काळापासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या लोकांवरील आर्थिक ताण वाढलेला आहे. 1 लाख 60 हजारांच्या पुढे गेलेला सोन्याचा दर आता कमी होण्याची शक्यता आहे. कारण सरकारने सोने आणि चांदीच्या आयात किमती कमी केल्या आहेत. मात्र सोने आणि चांदीच्या आंतरराष्ट्रीय किमती त्यांच्या उच्च पातळीच्या जवळ आहेत, त्यामुळे सोन्याच्या दरात किंचित कपात होऊ शकते. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आयातीतील शुल्क कपात लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे येत्या काळात सोने आणि चांदीच्या किमतीत घट होऊ शकते.

सोन्याची मूळ आयात किंमत अंदाजे 50 डॉलरने कमी करून ती 1518 डॉलर प्रति 10 ग्रॅम करण्यात आली आहे. चांदीची किंमत 800 डॉलरने कमी करण्यात आली असून ती आता $2657 प्रति किलोग्रॅम करण्यात आली आहे. हा कर सर्व प्रकारच्या सोन्याच्या आयातीवर लागू असणार आहे. जर जागतिक स्तरावर सोने आणि चांदीच्या किमती कमी झाल्या तर भारतातील सोने आणि चांदीच्या किमती कमी होणार आहे. यामुळे थेट ग्राहकांना फायदा होणार आहे.

कपात कशावर लागू होणार?

ही शुल्क कपात उच्च शुद्धतेच्या सोन्याच्या बार आणि नाण्यांवर तसेच चांदीच्या बुलियन आणि पदकांवर लागू होणार आहे. यात दागिने, इतर मौल्यवान धातूंच्या वस्तू आणि पोस्ट, कुरिअर किंवा वस्तूंद्वारे करण्यात आलेल्या सोन्याच्या आयातींचा समावेश नाही. त्यामुळे अशा दागिन्यांवर ग्राहकांना कर भरावा लागणार आहे.

सोने आणि चांदीची आयात

भारत हा सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे, तसेच भारत ही जगातील चांदीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारत आपल्या सोन्याची गरज पूर्ण करण्यासाठी आयातीद्वारे अवलंबून आहे. तसेच भारत देशात लागणारी 80 टक्क्यांहून अधिक चांदी परदेशातून आयात करतो.

गेल्या वर्षी भारताने आपल्या एकूण परकीय चलन साठ्यापैकी जवळजवळ 10 टक्के रक्कम सोने आणि चांदीच्या आयातीवर खर्च केला. 2026 मध्ये हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती वाढतच आहेत. त्यामुळे हा आकडा आणखी वाढू शकतो.

 

Follow Us